Skip to main content

Posts

Showing posts from December, 2018

शिवरायांचा मराठा मावळा कसा होता ?

शिवरायांचा मराठा दिसा़यला साधा भोळा, अंगाने रांगडा अन काटक, चेहरा उन्हानं रापलेला, डोक्यावर मुंडासं, गुडघ्या पावतो पैरण, अंगात मळका सदरा, पाठीला ढाल, कमरेला तलवार, पाय आनवाणी, ओठावर तुर्रेबाज मिशा, हनुवटीवर दाढीचे खुट, तोंडात गावरान पण अदबशीर भाषा, चालण्यात मर्दानी ढब, होसला मात्र सह्याद्रीवाणी बुलंद. हातातील तलवार व पाठीवरील ढाली शिवाय त्यांच्याकडे सैनिक असल्याचा कोणताच पुरावा नसायचा, गनिमाने रणभुमीवर ह्यांना लांबून पाहिलं तर त्याला वाटायचं हे यडं गबाळं रूप नुकतच शेत भांगलून आलय हे काय आपला सामना करणार ? पण हाच मर्द गडी जेव्हा समशेर उपसून रणसंग्रामात झेप घ्यायचा तेव्हा त्याच्या अंगात साक्षात रणमार्तंड संचारायचा, अंगात चित्त्याची चपळाई, नजरेत गरूडाची दाहकता व मनगटात शंभर हत्तींचे बळ घेऊन शत्रूवर चवताळून तुटून पडणारा मर्द मावळ्याचा रौद्र आवतार पाहून शत्रू क्षणार्धात गर्भगळीत झालेला असायचा. साधीसुधी दिसणारी मराठा पोरं इतकं भयाण रूप धारण करू शकतात हे शत्रूच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर असायचे, ह्या धक्क्यातून सावरायच्या आतच मराठ्यांच्या पोरांनी गनिमांची अर्ध्याहुनही अधिक फळी उ...

दांडपट्टा.

हे एक मराठ्यांच सर्वात आवडीच हत्यार,याची भेदकता तलवारीहुन जहाल,उभ्या भारतात या शस्त्रावर मराठ्यांइतके नियंत्रण कोणाचेच नाही,मुघल राजपुत लोकांमध्येही हे हत्यार असायचे,पण मराठे यात जास्त कुशल अन तरबेज होते,पट्टा फ़िरवणे मोठे कौशल्याचे काम आहे ,खुप कसब आणि अभ्यास असलेला माणुस पटटा व्यवस्थित फ़िरवु शकतो,पुर्वीचे मावळे १६ हात लांब पट्टाही वापरत,याला बेल्ट प्रमाणे कंबरेभोवती गुंडाळले जाई,सय्यद बंडा ला जिवा महालाने १६ हात लांबुन कलम केले होते. छोट्याश्या लिंबाचे दो न तुकडे पट्ट्याने होतात. आपण मराठीत पटाइत हा शब्द वापरतो,म्हणजे तरबेज,मुळात पट्टे चालवण्यात वाकबगार असलेल्या लोकांना पटाईत असे म्हणले जाते,तोच शब्द पुढे आपल्या बोली भाषेत रुढ झाला,मराठी हशमांमध्ये एक म्हण होती  # धारकरी  म्हणजे जे व्यक्ती तलवार , भाला तीर कमान अथवा अजुन काही अशा ४-५ हत्यारांमध्ये तरबेज असली की त्यांना "धारकरी" गणले जायचे.),अन अजुन एक म्हण होती की "दहा धारकरी तर एक पट्टेकरी " यावरुनच पटाईताला काय मान असेल हे लक्षात येते पट्ट्याची लांबी ५ फ़ुट असते,त्याचे पाते ४ फ़ुट असुन त्याची मुठ म्हणजे खोबळा साधा...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य

छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले, पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला, साध्या -भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला, स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधून घेतले; महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले, नवे निर्माण केले, योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला, आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला; सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्‍यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था… अशा अनेक व्यवस्था लावून दिल्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली; राजभाषा विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला; विविध कलांना राजाश्रय दिला. तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमाना...

शिरकाई देवीचे मंदिर

शिरकाई देवीचे मंदिर..... ⛳ राजधानी रायगड..... फोटो साभार : निखिल महामीनी....  

८ डिसेंबर १६९९....

औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला अजिंक्यताराचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू गड घेण्यासाठी बादशाहचे प्रयत्न सुरु झाले गडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होउन बसले गडावर तोफांचा मारा सुरु झाला, औरंग्जेबास जास्तीत जास्त आठवडाभरात गड ताब्यात येइल असे वाटत होते पण महीने गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देई नात एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतानढावा सुद्धा केला पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारा समोर मोगली सैन्य ाला माघार घ्यावी लागली.. २ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर मृत्यु झाला या बातमीने मोगली गोटात आनंदाचे वातावरण पसरले त्यांना वाटले आता मराठे शरण येतील आणि मग आपला उत्तरेतला मार्ग मोकळा पण कसले काय जरी या बातमीने मराठे खचले होते तरी सुद्धा त्यांनी किल्ला तसाच लढ़वायचा ठरविले आता त्यांना एक नवे नेतृत्व मिळाले होते ताराराणीच्या रुपात साक्षात् भवानी माताच मोग्लांचा विनाश करण्यास सरसावली होती.. राजाराम राजे जाउन महिना होउन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता १३ एप्रिल १७०० च्या पहाटे. ...

समर्थ रामदास स्वामी स्थापित शिवकालीन श्रीगणेशोत्सव !|| Shivakalin Ganesh festival

सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हटली जाते. ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे. गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे. भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे. प्रचलीत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. "समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !! सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !!" समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले. दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती...