८ डिसेंबर १६९९....

औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला अजिंक्यताराचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू गड घेण्यासाठी बादशाहचे प्रयत्न सुरु झाले गडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होउन बसले गडावर तोफांचा मारा सुरु झाला, औरंग्जेबास जास्तीत जास्त आठवडाभरात गड ताब्यात येइल असे वाटत होते पण महीने गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देई नात एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतानढावा सुद्धा केला पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारा समोर मोगली सैन्याला माघार घ्यावी लागली..
२ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर मृत्यु झाला या बातमीने मोगली गोटात आनंदाचे वातावरण पसरले त्यांना वाटले आता मराठे शरण येतील आणि मग आपला उत्तरेतला मार्ग मोकळा पण कसले काय जरी या बातमीने मराठे खचले होते तरी सुद्धा त्यांनी किल्ला तसाच लढ़वायचा ठरविले आता त्यांना एक नवे नेतृत्व मिळाले होते ताराराणीच्या रुपात साक्षात् भवानी माताच मोग्लांचा विनाश करण्यास सरसावली होती..
राजाराम राजे जाउन महिना होउन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता १३ एप्रिल १७०० च्या पहाटे. मोग्लांनि किल्ल्याच्या तटा खली दोन भुयारे खणली आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गढले गेले कित्येक मोगल तर उंच फेकले गेले आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ कापून काढले..
गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनि तब्बल साडेचार महीने औरंग्जेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल १७०० रोजी शरणागती पत्करली...
या युद्धाचा दाखला डॉ जयसिंहराव पवार देतात...
जॉर्ज हचिन्स बेलासिस (१८०७-१८६२) या चित्रकाराने १८५३ साली हे चित्र रेखाटले अजिंक्यतारा छायाचित्र....
No automatic alt text available.
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment