Skip to main content

Posts

।।शूरवीर बाजी पासलकर ।।

।।शूरवीर बाजी पासलकर ।। स्वराज्यासाठी पाहिलं बलिदान देणारे वीर बाजी पासलकर सभासदाच्या बखरीत या युद्धाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. राज्पुरीहून काय सावंत म्हणोन पांच हजार फौजेनिशी युद्धास आला. युद्ध मोठे होतां बहुत रणखंदल जाले. काय सावंत खास व बाजी पासलकर महायोद्धा, याच्या मिश्या दंडायेवढ्या, यांस पीळ घालून वारी केशांच्या आधारे निंबे दोहींकडे दोन ठेवीत होता, असा शुरमर्द ठेविला, याशी व त्याशी खासाखाशी गांठ पडली. एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार मारले. मग उभायान्ताकडील दळ आपले जागीयास गेले. बाजी पासाल्कारांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.  

राष्ट्ररक्षणाच्या इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवराय !

भारताला सहस्रो मैलांचा समुद्रकिनारा लाभला आहे. १ सहस्र वर्षांपूर्वी दक्षिण भारतातील चोल राजांनी त्यांच्या शक्तीशाली नौदलाच्या साहाय्याने पूर्व आशियातील मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया इत्यादी देशांवर वर्चस्व निर्माण करून आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रभाव निर्माण केला होता. कंबोडियातील अकोरवाट येथील जगातील सर्वांत भव्य हिंदु मंदिर आजही त्याची साक्ष देत उभे आहे; मात्र नंतरच्या काळात निर्माण झालेल्या समुद्रबंदीसारख्या अत्यंत घातक रूढीमुळे सागराशी नाते तोडलेल्या भारतियांनी समुद्रावरील वर्चस्व गमावले. त्याचाच परिणाम नंतरच्या काळात याच समुद्रावरून आलेल्या परकीय सागरी सत्तांनी या देशालाच गुलाम केले. उत्तरेकडील खैबरखिंड आणि बोलण खिंडीतून हिंदुस्थानशी होणारा व्यापार थांबल्यावर पोर्तुगीज आक्रमक वास्को-द-गामा याने आफ्रिकेला वळसा घालून हिंदुस्थानच्या समुद्रकिनार्‍यावर येण्याचा नवा मार्ग शोधून ख्रिस्ताब्द १४९८ मध्ये कालिकत बंदरात पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच या युरोपीय सत्तांनी व्यापाराच्या निमित्ताने हिंदुस्थानात येऊन जागोजागी त्यांच्या वसाहती स्थापन केल...

व्हिएतनामचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !

दक्षिण पूर्वेतील व्हिएतनामसारखा छोटा देश आपल्या स्वातंत्र्यासाठी वर्षानुवर्षे अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या जगातील सर्वात बलाढ्य अमेरिकेशी लढत राहिला आणि केवळ छत्रपतींच्या प्रेरणेने जिंकलासुद्धा. छत्रपतींनीही याच गनिमी काव्याचा वापर करून मोघलांना पराभूत केले होते. व्हिएतनामी योद्ध्यांनी तोच धडा गिरवला होता. व्हिएतनाम युद्धातील विजयानंतर तेथील राष्ट्रपतींनी स्वतःच छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा धडा आम्ही गिरवला; म्हणूनच आम्ही बलाढ्य अमेरिकेला नमवू शकलो ! असे उद्गार काढले होते. व्हिएतनाम हा एक असा देश आहे की, त्याने हिंदुस्थानकडून जी प्रेरणा घेतली, त्याचा एक इतिहासच आहे. व्हिएतनाम आणि अमेरिकेत २० वर्षे युद्ध चालले. अमेरिकेला वाटत होते की, या देशाला नष्ट करण्यासाठी अगदीच थोडा वेळ लागेल. केवळ काही घंण्टेच पुरे होतील; परंतु व्हिएतनामचे युद्ध अमेरिकेला चांगलेच महागात पडले; कारण व्हिएतनामी योद्ध्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून त्यांची युद्धनीति अवलंबली होती. व्हिएतनाम या युद्धात विजयी झाल्यानंतर त्यांच्या राष्ट्रपतींना पत्रकारांनी या विजयाचे रहस्य विचारले, ...

आजही हवेत छत्रपती शिवाजी महाराज !

१. छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्कृष्ट नेतृत्व गुण ! १ अ. युद्धप्रसंगातील नियोजनकौशल्य ! : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अभ्यास आणि नियोजनयांच्याविना एकही गोष्ट केली नाही. शाहिस्तेखानावर आक्रमण करण्यासाठी लाल महालात केवळ ५०जण गेले होते. तेव्हाही १,३५,००० विरुद्ध १२,००० हे प्रमाण होते. अफजलखानाच्या वेळी तर १० सहस्रविरुद्ध ३६ सहस्र हे प्रमाण होते. कोंडोजी फर्जदांचा पन्हाळ्याचा संग्राम असो कि शिवा काशीद अन्बाजीप्रभू देशपांडे यांचा पावनखिंडीतला पराक्रम असो, हे सर्व प्रसंग त्यांचे उत्तम नियोजन सांगतात ! १ आ. माणसांची उत्तम पारख : छत्रपती शिवाजी महाराजांनी बोरू आणि समशेर यांना समानसमजले. त्यांना उत्तमपणे माणसांची पारख होती. पळी-पंचपात्री हातांत घेणारी माणसे (ब्राह्मण) परराष्ट्रखात्याचे वकील म्हणून उभे झाले. बाजीप्रभु देशपांडे यांच्यासारखे आदिलशाही सोडून महाराजांना येऊनमिळाले. त्यांनी महाराजांमध्ये काय पाहिले ? संभाजी कावजी कोंढाळकर, बहिर्जानाईक यांच्यासारखीपहिल्यांदा सामान्य वाटणारी माणसे नंतर असामान्य कर्तृत्व कशी गाजवून गेली ? असे कितीतरी मावळे,कितीतरी सरदार आहेत. त्यांना स्वर...

छत्रपती शिवाजी महाराजांची अदात्त आणि आशयघन राजमुद्रा

प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता । शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। अर्थ : प्रतिपदेचा चंद्र कसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला विश्ववंदनीय होतो, तशी शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्वाला भद्र, म्हणजे कल्याणकारी वाटते. शिवमुद्रेचा रचयिता इतिहासाला ज्ञात नसणे या मुद्रेवरील आशयगर्भ श्लोकाचा कर्ता कोण, रचविता कोण हे अंदाजाने काही सांगितले जाते. कोणी म्हणतात, शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांनीच तो खोल आशयाचा श्लोक रचला असावा. कोणाला वाटते समर्थ रामदासस्वामींचीच ती रचना असावी. रामचंद्रपंत अमात्यांनी, तर राजव्यवहार कोश लिहिला. शिवमुद्रेवरील आशय लिहिणे त्यांना काय कठीण ! कोणाला असाही तर्क लढवावासा वाटतो की, काशीचे प्रकांड पंडित गागाभट्ट यांचीच ही रचना असणार ! हे इतके विकल्प कसे सोडवायचे ? अर्थ एवढाच की, शिवमुद्रेचा रचविता इतिहासाला ज्ञात नाही. शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्वाला कल्याणकारी वाटणे शिवमुद्रेवरील दोन ओळींचा तो श्लोक अर्थगर्भ तर आहेच; पण तो एक साहित्यालंकारही आहे. आजवर राजमुद्रा कितीतरी झाल्या; परंतु...

मराठी भाषेतून राज्यकारभार चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज !

१. ‘पेशवा, सुरनीस, सरनौबत, मुजुमदार अशा असंख्य परकीय शब्दांऐवजी पंतप्रधान, सचिव, सेनापती, अमात्य, असे आपले शब्द रूढ होत गेले. २. मातृभाषा हा राष्ट्राचा प्राण आहे. भाषा म्हणजे राष्ट्राची संजीवनीच ! ३. मराठीत प्रचलीत झालेले परकीय शब्द : ‘संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्त झाले व यादव रामराज्य बुडाले, तेव्हापासून मराठी भाषेवर यवनांचे आक्रमण होऊ लागले. इतकेच नव्हे, तर आम्हाला या परकीय नावारूपांचा अभिमान वाटू लागला. अ. पुढे पुढे आमची नावे व आडनावेही पुसली जाऊ लागली. सुलतानराव, रुस्तमराव, हैबतराव, बाजीराव, शहाजी, पिराजी अशी नावे आली. आ. वैदिक शास्त्री म्हणवून घेणार्‍यांनीही सुलतानभट, होशिंगभट अशी नावे स्वीकारली.’ ४. शिवसन्निध काळातील ‘मराठी’ पत्र : ‘शिवसन्निध काळातील शाही हुकुमनामे व अन्य पत्रव्यवहार वाचले, तर बुद्धी अवाक् होते. उदाहरणार्थ हे ‘मराठी’ पत्र पहा. ‘अजरख्तखाने शहाजीराजे दाम दौलतहु बजाने कारकुनानी व हवालदारांनी हाल व इस्तकबाल …वगैरा वगैरा.’ या पत्रातील काही शब्दच मराठी आहेत. पत्राचे व्याकरण, त्यातील मराठी प्रत्यय, कर्ता, कर्म, क्रियापद सुदैवाने अर्थ समजण्याइतपतच वाप...

इंग्रजांना धडा शिकवणारे शिवाजी महाराज !

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वस्तूंची सूची पाहिल्यास त्यामध्ये ‘खोबर्‍या’च्या प्रकाराच्या सूचीत ‘राजापुरी खोबरे’ असे स्वतंत्र नाव त्यात नमूद केलेले असते. ब्रिटीश व्यापार्‍यांची राजापूरला वखार होती. त्यांनी तेथील व्यापार्‍यांना हाताशी धरून त्यांना पैसे चारले आणि आपल्या शेतकरी बांधवांकडून ते अत्यंत पडेल भावाने हे खोबरे खरेदी केले. तेव्हा दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. शेतकर्‍यांकडे त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा याकरता माल दुसर्‍या बाजारात पाठवण्याइतपत त्यांची आर्थिक कुवत नव्हती. म्हणून ते हतबल होते. त्यांना प्रचंड हानी सहन करावी लागली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पत्र लिहून याबाबत कळवले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ताबडतोब इंग्रजांकडून जो माल महाराजांच्या मुलुखात येत होता, त्यावर २०० टक्के दंडात्मक आयात शुल्क बसवले; जेणेकरून इंग्रजांच्या मालाची किंमत वाढून तो विकला जाऊ नये. या प्रकारामुळे इंग्रजांची तारांबळ उडाली. त्यांच्या मालाची विक्री कमी झाली. त्यामुळे इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिले की, आमच्यावर दया करा, सीमाशुल्क कमी करा. छत्रप...