Skip to main content

शिवचरित्रमाला भाग ५

यह तो पत्थरों की बौछार है!
बेलसरच्या फत्तेखानी छावणीवर अचानक
छापा घालून शिवाजी महाराज आपल्या
मावळ्यांनिशी पसार झाले। ते पुरंदरावर
आले. झेंड्याची तुकडी खरं म्हणजे साफ
कापली जाणार होती. भगवा झेंडा
शत्रूच्या हातात पडणार होता. पण बाजी
जेध्यांच्या बहादुरीमुळे तुकडी आणि झेंडा
बचावले. ते ही गडावर आले. रात्रीची वेळ ,
पूर्ण विजय नव्हे , पण एक यशस्वी धडक
महाराजांनी आक्रमक शाही छावणीवर
मारली होती.
महाराजांनी लगेच आपल्या सगळ्याच
सेनेला हुकुम दिला की , पुरंदर गडाच्या
उत्तर तटावर जास्तीत जास्त धोंड्यांचे
ढीग जागोजागी गोळा करून ठेवा। मावळे
त्वरित कामाला लागले. डोंगरावर
धोंड्यांना काय तोटा! उत्तर बाजूच्या
तटावर धोंड्याचे लहानमोठे ढिगारे
घडीभरात जमले.
महाराजांनी आपल्या मावळ्यांना म्हटले ,
‘ आता मार बसल्यामुळे चिडलेला तो
फत्तेखान आपल्या या पुरंदरावर याच उत्तर
बाजूवर सकाळी चाल करून येईल। तो वर येत
असताना आमची इशारत होईपर्यंत तुम्ही
कुणीही त्याच्यावर कसलाही मारा
करूनका। येऊ द्यात त्याला वर। आम्ही
इशारत करू अन् मग तुम्ही शत्रूवर या
मोठ्यामोठ्या धोंड्यांचा मारा करा.
‘ सोप्पं काम। स्वस्थ काम. शत्रूच्या सुसज्ज
सैन्यावर दारुगोळ्यांचा हल्ला करणं
स्वराज्याच्या या शैशववयात
महाराजांना परवडणारं नव्हत. युद्ध
साहित्यही कमी. मावळी सैन्यही कमी.
त्यावर महाराजांनी ही दगडधोड्यांची
लढाई अचूक योजली. बिनभांडवली धंदा.
पसाभर धोंड्यापासून मिठीभर
धोंड्यापर्यंत वेगवेगळ्या आकारांचे ,
सह्यादीतील हे दगडी सैनिक महाराजांनी
तयार ठेवले होते.
महाराजांचा अंदाज अचूक ठरला।
उजाडत्या उजेडात फत्तेखान आपलं सार
सैन्य घेऊन पुरंदरच्या उत्तर पायथ्याशी
दौडत आला. तुफान , प्रचंड पुरंदर
त्याच्यासमोर उभा होता. आधीच्या
मावळी तडाख्याने खान चिडला होता
आणि त्याने आपल्या फौजेला घोड्यावरून
पायउतार होऊन एकदम एल्गार करण्याचा
हुकुम दिला. सुलतानढवा! म्हणजेच एकदम
हल्ला. शाही फौज एकदम पुरंदरावर तुटून
पडली. त्यांच्या युद्धगर्जना दणाणू
लागल्या. पुरंदरगड आणि पुरंदरगडी एकदम
शांत होते. चिडीचिप्प. ते दडलेले होते.
फत्तेखानाची फौज गडावर धावून
निघाली होती. गडाच्या निम्यापर्यंत
चढलीही. अन् ऐन टप्प्यात शत्रू आलेला
दिसताच महाराजांनी गडावरच्या
मावळ्यांना इशारा केला. अन् गर्जना
सुरूझाल्या. शिंगे धुत्कारूलागली. अन् मग ते
लहानमोठे धोंडे गडावरून उतारावर धाड्
धाड् धाड् उड्या घेत फत्तेखानच्या
सैन्यावर तुटून पडले. एका का दोन! पाउसच.
शाही सैन्य तो दगडांचा वर्षाव पाहून
चकीतच झालं. थडाथडा मार बसू लागला.
कुणी मेलं , फारजण जखमी होऊ लागले. हा
मारा सोसण्याच्या पलिकडचा होता.
फत्तेखानालाही खालून हा दगडांचा
येणारा वर्षाव दिसत होता। तो थक्कच
झाला। अन् म्हणाला , ‘ यह तो पत्थरों
की बौछार है!
‘ आता ? मावळ्यांना चेव आला होता।
केवळ दगड धोंड्यांची पुष्पवृष्टी करून
मावळ्यांनी गनिम हैराण केला होता.
गनिम आरडत ओरडत तोंड फिरवून गडाच्या
पायथ्याकडे त्या उतारावरून धावत सुटला
होता. उड्या मारीत , पडत , घसरत ,
दगडांचा मार खात हे शाही सैन्य उधळलं
गेलं होतं. जणू वादळातला
पालापाचोळा. या फत्तेखानाची आता
फळी फुटली होती. महाराज आपल्या
सैन्यानिशी गडावरून बाहेर पडले आणि
गनिमावर तुटून पडले. अखेर फत्तेखान
सासवडच्या दिशेने पळत सुटला. येथून
सासवड फक्त १० कि. मी.वर. गनिम
सासवड गावात आश्ायाला घुसला.
मावळ्यांनी पाठलाग करून त्यांना झोडपून
काढले. फत्तेखान कसाबसा ओंजळभर
सैन्यानिशी धूम पळत होता. विजापूरच्या
दिशेनं! त्याचं सैन्य आणि स्वप्न मराठ्यांनी
एकाचवेळी पार उधळून लावलं होतं.
फत्तेखानाच्या त्या मोठ्या थोरल्या
सैन्याचा आपल्या लहानशा सैन्यानिशी
कमीतकमी वेळात , कमीत कमी
युद्धसाहित्यानिशी , पूर्ण पराभव केला
होता. कोणची ही जादू ? कुणाचा हा
चमत्कार ? हा गनिमीकाव्याच्या
शक्तीयुक्तीचा परिणाम , जादू , चमत्कार.
विचारपूर्वक आपल्या लहानशा
शक्तिनिशी प्रचंड शाहीशक्तीला कसं
हरवायचं याचं महाराजांचे चिंतन इथं दिसून
येतं.
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...