मुंबईप्रमाणेच देशातील प्रमुख शहरांना वैशिष्ट्यपूर्ण इतिहासाची जोड मिळाली आहे. त्यामुळे शहरातील इतिहासाच्या पाऊलखुणांना भेट देण्याची संधी फार दुर्मीळ असते. मुंबई : मुंबईप्रमाणेच देशातील प्रमुख शहरांना वैशिष्ट्यपूर्ण इतिहासाची जोड मिळाली आहे. त्यामुळे शहरातील इतिहासाच्या पाऊलखुणांना भेट देण्याची संधी फार दुर्मीळ असते. मात्र नुकतेच कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने एका वेगळ्या धाटणीच्या प्रदर्शनातून कोलकाता शहराच्या इतिहासाशी ऋणानुबंध जोडणारे अनोखे प्रदर्शन आयोजित केले आहे. कोलकाता १८ व्या आणि १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ‘महालांचे शहर’ म्हणून ओळखले जात होते. कोलकाता लंडननंतर इंग्रजी साम्राज्याचे दुसरे मुख्य शहर बनले. इ.स. १७७३ पर्यंत कोलकाता इंग्रज भारताची राजधानी बनली तसेच ते साम्रज्याच्या शक्तीचे प्रदर्शन करणाºया बºयाच सार्वजनिक इमारतींचे केंद्र बनले. या ब्रिटिशकालीन कोलकाता शहराची स्मृतिचित्रे ‘कोलकाता वसाहतकालीन दृष्टिक्षेप’ या प्रदर्शनातून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयमध्ये प्रिंट्स अॅण्ड ड्रॉइंग गॅलरी येथे मांडण्यात आली...
Chhatrapati Shivaji Maharaj photos and history.