इसिसने वर्ष २०२० पर्यंत भारतापासून
युरोपपर्यंतचा भाग इस्लाममय करायचा मनोदय घोषित केला आहे. काही शतकांपूर्वी
आलेल्या इस्लामी लाटेला हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे वेसण घातली
होती आणि त्यानंतर थोरले बाजीराव प्रभूतींनी ती परतवून लावली होती.
मातृभूमीचे रक्षण करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. सध्याचे हिंदू मात्र
त्यावर काही करतांना दिसत नाहीत आणि पुन्हा छत्रपती यावेत अन् आपले रक्षण
करावे, असे त्यांना वाटते काय ?
नुकतेच छत्रपती शिवरायांचे एक पत्र सापडले आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी ते औरंगजेबाच्या सरदारास काय लिहिताहेत, ते वाचा…
शिवरायांचा आठवावा साक्षेप
माझ्या मायभूमीचे रक्षण करणे माझे कर्तव्य !
माझ्या मायभूमीचे रक्षण करणे माझे कर्तव्य !
छत्रपती शिवाजी महाराजांनी
औरंगजेबाच्या अधिकार्यांना पाठविलेले एक फार्सी पत्र दोन जुन्या
पत्रसंग्रहांमध्ये समाविष्ट आहे. त्यावर तारीख नसली, तरी ते
शाहिस्तेखानाच्या छाप्यानंतर लिहिले आहे, हे त्यातील उल्लेखांवरून स्पष्ट
समजते. पत्राचा अनुवाद पुढीलप्रमाणे आहे.
गेली तीन वर्षे (औरंगजेबाचे)
तालेवार उमराव या प्रदेशात येत आहेत. माझा मुलुख आणि माझे किल्ले काबीज
करण्याचा हुकूम बादशाह त्यांना देतो. लवकरच काबीज करतो, असे उत्तर ते
देतात. या दुर्गम मुलखात अफाट कल्पनाशक्तीचा घोडा दौडवणेही शक्य नाही. मग
तो काबीज करणे तर दूरच. तरीही सत्य दडवून खोट्या गोष्टी लिहिण्यास त्यांना
लाज वाटत नाही.
(बादशहाने पूर्वी काबीज केलेले)
कल्याणी आणि बिदरचे किल्ले उघड्या मैदानात होते. माझी मायभूमी तशी नाही.
तिच्यात २०० कोस लांब आणि ४० कोस रूंद अशा उत्तुंग डोंगरांच्या रांगा आहेत
आणि ओलांडण्यास अवघड अशा नद्या आहेत. तिथे ६० किल्ले बांधले आहेत,
ज्यांपैकी काही समुद्रकिनार्यावर आहेत.
आदिलशहाचा उमराव अफझलखान मोठे सैन्य
घेऊन जावळीस आला आणि मृत्यूमुखी पडला. जे घडले, ते तुम्ही प्रामाणिकपणे
बादशहाला का कळवत नाही ? गगनचुंबी पर्वतांच्या आणि पाताळापर्यंत जाणार्या
दर्यांच्या या मुलखात मोहीम करण्यास अमीरूल उमरा (शाहिस्तेखान) याची
नेमणूक झाली. त्याने तीन वर्षे खपून बादशहाला कळवले की, माझा (म्हणजे
शिवाजी महाराजांचा) पूर्ण पराभव झाला आहे आणि थोड्याच दिवसांत माझा मुलुख
काबीज होईल. शेवटी या खोटेपणाचे फळ तो कसे पावला आणि नामुष्की होऊन परत
गेला ते जगजाहीर आहे.
माझ्या मायभूमीचे रक्षण करणे, हे माझे
कर्तव्य आहे. आपली इज्जत राखण्यासाठी या उमरावांनी बादशहाला खोट्या गोष्टी
लिहून कळवल्या असल्या, तरी ईश्वराच्या कृपेने, या विरक्त मनुष्याच्या
प्रिय देशावर आक्रमण करणार्या कोणाच्याही इच्छेची कळी कधी उमललेली नाही.
ज्या रक्ताच्या नदीतून कोणी मनुष्य आपली होडी पलीकडे नेऊ शकला नाही त्या या नदीपासून शहाण्या मनुष्याने दूर रहावे.
या पत्रात महाराजांनी स्वत:चा उल्लेख
विरक्त असा केला आहे. समर्थ रामदासस्वामींनी या जाणत्या राजाला लावलेले
श्रीमंत योगी हे विशेषण किती सार्थ आहे.
– डॉ. अनुराधा कुलकर्णी, देशप्रेमी शिवराय
0 comments:
Post a Comment