७. शिवचरित्र विसरण्याच्या कृतघ्नपणाचे दुष्परिणाम !
इंग्रज जेव्हा या देशात आले, तेव्हा
त्यांनी रायगड ताब्यात घेतला व महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांचे साम्राज्य
नष्ट केले. तसेच सर्व संस्थाने खालसा करून टाकली. रायगडावर केलेल्या
बाँबहल्ल्यामुळे रायगड १८ दिवस जळत होता. रायगडावरील शिवाजी महाराजांनी
बांधलेले आठ महाल इंग्रजांनी उद्ध्वस्त करून टाकले. रायगडावरील सिंहासनाचे
काय केले, ते माहीत नाही.
सर रिचर्ड टेंपल हे भारताचे गर्व्हनर
होते. त्यांना एकदा विचारले, ‘‘औरंगजेब ७ लाख मुसलमानांची फौज घेऊन
महाराष्ट्रात आला. २५ वर्षे तो लढत होता; पण २५ वर्षांत त्याला महाराष्ट्र
जिंकता आला नाही. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य नष्ट करता
आले नाही. औरंगजेबाला ७ लाख माणसांच्या साहाय्याने प्रचंड दारूगोळा असतांना
जे २५ वर्षांत जमले नाही, ते तुम्ही १०-१५ वर्षांत कसे काय साध्य केले ?
इतक्या कमी शस्त्रांनी कसे काय हे साध्य केले ?’’ त्या वेळी रिचर्ड टेंपल
यांनी दिलेले उत्तर अगदी मौलिक आहे. त्यांनी सांगितले, ‘‘जेव्हा औरंगजेब
महाराष्ट्रात आला होता, तेव्हा अवघ्या महाराष्ट्रातील लोकांना शिवचरित्राचे
स्मरण होते. त्यानंतर त्याला सर्व लोक विसरले; म्हणून आम्हाला हा
महाराष्ट्र प्राप्त झाला.’’
म्हणूनच, हिंदूंनो, आजचे राज्यकर्ते
शिवचरित्र विसरले असले, तरी तुम्ही ते विसरण्याचा कृतघ्नपणा करू नका.
शिवचरित्र विसरण्याचा परिणाम पराधीनतेत होतो, हे सत्य जाणा ! ते जाणून
तुम्ही शिवचरित्रानुसार मार्गक्रमण केले, तरी दैनिक ‘सनातन प्रभात’ने
आजच्या अंकातून केलेली शिवचरित्राची उजळणी श्रीकृष्णाच्या चरणी रूजू झाली,
असे म्हणता येईल !
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात
0 comments:
Post a Comment