आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वस्तूंची सूची
पाहिल्यास त्यामध्ये ’खोबर्या’च्या प्रकाराच्या सूचीत ‘राजापुरी खोबरे’
असे स्वतंत्र नाव त्यात नमूद केलेले असते. ब्रिटीश व्यापार्यांची
राजापूरला वखार होती. त्यांनी तेथील व्यापार्यांना हाताशी धरून त्यांचे
पैसे चारले आणि आपल्या शेतकरी बांधवांकडून ते अत्यंत पडेल भावाने हे खोबरे
खरेदी केले. तेव्हा दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. शेतकर्यांकडे
त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा याकरता माल दुसर्या बाजारात
पाठवण्याइतपत त्यांची आर्थिक कुवत नव्हती. म्हणून ते हतबल होते. त्यांना
प्रचंड हानी सहन करावी लागली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पत्र
लिहून याबाबत कळवले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ताबडतोब
इंग्रजांकडून जो माल महाराजांच्या मुलुखात येत होता, त्यावर २०० टक्के
दंडात्मक आयात शुल्क बसवले; जेणेकरून इंग्रजांच्या मालाची किंमत वाढून तो
विकला जाऊ नये. या प्रकारामुळे इंग्रजांची तारांबळ उडाली. त्यांच्या मालाची
विक्री कमी झाली. त्यामुळे इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र
लिहिले की, आमच्यावर दया करा, सीमाशुल्क कमी करा. छत्रपती शिवाजी
महाराजांनी ताबडतोब खलिता पाठवला, मी शुल्क उठवण्यास एकाच अटीवर तयार आहे
की, तुम्ही आमच्या राजापूरच्या शेतकर्यांची जी हानी केली ती भरपाईसह योग्य
प्रकारे भरून द्या. आणि ते भरून दिल्याची पोचपावती शेतकर्यांकडून आली की,
मग मी दंडात्मक शुल्क उठवीन, अन्यथा नाही. अखेर ब्रिटिशांना माघार घ्यावी
लागली. दुसर्या दिवसापासून त्यांनी त्या व्यापार्यांना गाठून
त्यांच्यामार्फत सर्व शेतकर्यांना त्यांचे जितके रास्त पैसे होते,
त्यासोबत हानीभरपाईची रक्कम देण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेतकर्यांनी
छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची भरपाई मिळाली असून ते समाधानी असल्याचे
कळवले. त्यानंतर महाराजांनी सीमाशुल्क उठवले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...
Comments
Post a Comment