एेतिहासिक वारसा असलेल्या जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस सकलेश्वर मंदिर लेणी मंदिर असून या ठिकाणच्या दुर्लक्षित बाराखांबी परिसरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सीताफळाचे झाड मुळासकट काढताना अनेक देवदेवतांच्या शेकडो शिल्प व शिलालेख सापडले आहेत.हे शिल्प बौद्ध की शिवकालीन आहेत,हे अद्याप स्पष्ट झाले नसून पुरातत्त्व विभागाने अजून या मंदिराला भेट दिलेली नाही.त्यामुळे ही दुर्मिळ शिल्पे चोरीस जाण्याची भीती स्वयंसेवकांकडून व्यक्त होत आहे.
अंबाजोगाई शहराजवळील सकलेश्वर मंदिर लेणी मंदिर असून यालाच बाराखांबी म्हणतात कलात्मक व खास रूपगर्वितांच्या शिल्पामुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे.या मंदिराची उभारणी शके ११५० म्हणजेच इ.स.१२२९ मध्ये झाल्याचा उल्लेख शिलालेखात आहे.मध्ययुगीन कालखंडातील हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून या मंदिराची उभारणी सिंघनदेव यादवांचा सेनापती खोलेश्वराने केलेली आहे.
मंदिराच्या शिलालेखातील अप्रतिम शिल्पे कर्नाटकातील एव्होळे मंदिराच्या स्थापत्य कलेशी साधर्म्य दाखवणारी आहे.मुळात सकलेश्वर मंदिर अवकाशातून शिवपिंडीच्या आकाराचे दिसते.
0 comments:
Post a Comment