अपरिचित असे काही.

जेजुरी गडावरील " छत्रपती
शिवराय आणि छत्रपती शहाजी
राजांची " अविस्मरणीय भेट…!!!
वेरूळ गावचे पाटील असलेले भोसले
घराणे मालोजी राजे भोसल्यांना
पुणे व सुपे परगण्याची जहागिरी
मिळाल्यानंतर पश्चिम
महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित
झाले.तेव्हा पासून क-हेपठारच
आणि भोसल्यांच अतूट नाते आहे.
जेजुरी व श्रीखंडोबा संदर्भात
उपलब्ध कागदपत्रांवरून भोसले
घराण्याचा घेतलेला धावता
आढावा.…!!!
मालोजीराजांची पुणे व सुपे
परगण्याची जहागिरी त्यांच्या
मृत्यू नंतर वयाच्या पाचव्या
वर्षी शहाजी राजांना मिळाली
व आपले काका विठोजीराजे
भोसले यांच्या
मार्गदर्शनाखाली त्यांची
कारकीर्द फुलू लागली. पुढील
काळामध्ये पराक्रमी
शहाजीराजांनी निजामशाही
किंवा आदिलशाहीमध्ये
स्वकर्तुत्वावर जहागिरी
मिळवली व टिकवली होती सुपे
परगण्याची जहागिरी बहुतांश
काळ त्यांचेकडेच असल्याने क-
हेपठारावर त्यांचा नेहमीच
वावर होता. जिजाऊ मासाहेब व
शिवराय यांचेकडे पुणे प्रांतातील
कारभार सोपविल्यानंतर त्यंचा
मुक्काम अखेर पर्यंत बंगरूळलाच
होता.'
चिटणीसाची बखर' मधील
वर्णनानुसार शिवाजी
महाराजांची व शहाजी राजांची
ऐतिहासिक भेट जेजुरगडावर
झाली होती. याभेटीचे वर्णन
करताना बखरकार म्हणतो ही
भेट ब-याच कालावधीनंतर होत
असल्याने प्रत्यक्ष समोरासमोर
उरभेट होण्यापूर्वी कास्याच्या
परातीमधील तुपामध्ये मुखदर्शन
घेऊन मगच प्रत्यक्ष भेट घेतली.
या ऐतिहासिक भेटीचे समूहशिल्प
जेजुरगडावर नव्याने उभे रहात
आहे.

Image may contain: outdoor
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment