Skip to main content

Posts

Showing posts from August, 2018

शिवजन्मभुमी शिवनेरी शिवजन्मोत्सव सोहळा

सह्याद्रीचे शौर्य अभेद्य किल्ल्यांच्या रुपात आजही विद्यमान आहे.

सह्याद्रीचे शौर्य अभेद्य किल्ल्यांच्या रुपात आजही विद्यमान आहे. प्रत्येक किल्ला, त्याच्या अवतीभवतीचे गावे, गावागावातील माणसे, लढवय्ये, मावळे, हवालदार, भालदार, धारकरी, हारकरी, किल्यावरच्या बाजारपेठा. पायथ्याची गावे, गावागावातील विविध इतिहास, कथा, दंतकथा काही ज्ञात तर काही अज्ञात. आपणास एकच हिरकणी माहीत आहे. पण अशा अनेक हिरकण्या ह्या सह्याद्रीने पाहील्या असतील. अनेक बहादुर मर्द मावळे गावागावात, वस्त्यावस्त्यांमध्ये असतील.

किल्ले राजमाचीवरून दिसणारा सुंदर कातळधर धबधबा..

छायाचित्र - रोहीत घाडी

शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ११ जुलै १६५९

अफजलखानाशी लढावयास शिवाजी राजे राजगडाहून प्रतापगडावर गेले. स्वराज्याच्या भूमीवरती (१२ मावळ प्रांतात) युद्ध होऊ नये म्हणुन स्वराज्याच्या सरहद्दीवरती जाउन लढायची शिवरायांची रणनीती होती. शिवाय अफझलखानाच्या अवजड फौजेशी लढाईसाठी जावळी ही अतिशय योग्य रणभूमी आहे हे राजांना खुप आधी पासून पक्के ठावुक होते. त्यासाठीच तर त्यांनी २ वर्षात भोरप्याच्या डोंगरामधून प्रतापगड बांधून काढला होता. त्यात प्रतापगड हा मुळातच भयाण सह्याद्रीच्या एकदम बेचक्यातील ही जागा. प्रतापगड ला जाण्याची एकच वाट रणतोंडीची वाट ज्या वाटेवरून जाताना तोंड रडल्यासारखंच होणार अशी ही वाट. इतकी नैसर्गिक अनुकलता शिवासुत्रासाठी (गनिमीकाव्यासाठी) पुरेशी होती. उन्मत्त हत्तीला जंगलात खेचून आणून मारायचा डाव लवकरचं फत्ते केला जाणार होता... ११ जुलै १६६७ मिर्झा राजे जयसिंह यांचा बूर्‍हाणपूर येथे मृत्यू. संदर्भ:- "सह्याद्रीचे अग्निकुंड" लेखक:-सूरज बबन थोरात सह्याद्री प्रतिष्ठाण

चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी

चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा टाळ घोषातुनी साद येते तुझी दावते वैष्णवांना दिशा छायाचित्र - गणेश बागल

कैलास लेणी

भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेण्यांकडे पाहिले जाते . हिंदू , बौद्ध आणि जैन संस्कृतीचे दर्शन घडविणारी शिल्पे या लेण्यांमधून आहेत . कळसापासून पायापर्यंत अशी निर्मिती झालेल्या कैलास लेणीतील कलाकुसर , कोरीव काम आश्चर्यकारक आहे . जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या वेरूळला देश - विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात ...औरंगाबाद शहरापासून ३० कि . मी . वरील खुलताबाद तालुक्यात वेरूळ आहे . प्राचीन व्यापारमार्गाच्या छेदस्थानी वसलेल्या आणि शतकानुशतके पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या वेरूळचा उल्लेख अरब आणि युरोपियन प्रवाशांच्या प्रवासवर्णनामध्ये ठळकपणे आढळतो . चंद्रकोरीसदृश्य आकाराच्या डोंगरकुशीत वसलेली वेरूळ लेणी दख्खन पठाराभिमुख , दक्षिणोत्तर रेषेत वेरूळच्या डोंगरात सुळ्याच्या सहाय्याने कोरून काढण्यात आली आहेत . बौद्ध लेणी क्रमांक एक ते १२ची निर्मिती इसवी सन पाच ते सातव्या शतकादरम्यान , हिंदू लेणी क्रमांक १३ ते २९ची निर्मिती इसवी सन आठ ते नवव्या शतकादरम्यान आणि जैन लेणी क्रमांक ३० ते ३४ची निर्मिती इसवी सन नऊ व ११व्या शतकादरम्यान करण्यात आली . सरळ ...

राजीयांचा गड..... .

राजीयांचा गड..... . राजगड 🚩 . . . छायाचित्र - तुषार चित्ते

माऊली माऊली

छायाचित्र अली बागवान  

सोशल मिडीयाचा चांगला इफेक्ट...

तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी देवीच्या पाठीमागील बाजूस छञपती शिवाजी राजद्वार नावाचा मोठा दरवाजा असून दरवाजाच्या वरील बाजूस असणाऱ्या नावाची काही अक्षरे गळुन पडली होती..छञपतींच्या नावामुळे चर्चा होणे स्वाभाविक होते...परंतु प्रसंगावधान राखून ही बाब चर्चेचा विषय होऊ नये म्हणून त्वरीत वरिष्ठांच्या निदर्शनास आणली...याचा इफेक्ट म्हणून नावाची दुरुस्ती झाली...धन्यवाद! प्रशासनाने असेच सदैव कार्यतत्पर रहावे ही भाविकांची अपेक्षा !!