शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ११ जुलै १६५९

अफजलखानाशी लढावयास शिवाजी राजे राजगडाहून प्रतापगडावर गेले.
स्वराज्याच्या भूमीवरती (१२ मावळ प्रांतात) युद्ध होऊ नये म्हणुन स्वराज्याच्या सरहद्दीवरती जाउन लढायची शिवरायांची रणनीती होती. शिवाय अफझलखानाच्या अवजड फौजेशी लढाईसाठी जावळी ही अतिशय योग्य रणभूमी आहे हे राजांना खुप आधी पासून पक्के ठावुक होते. त्यासाठीच तर त्यांनी २ वर्षात भोरप्याच्या डोंगरामधून प्रतापगड बांधून काढला होता. त्यात प्रतापगड हा मुळातच भयाण सह्याद्रीच्या एकदम बेचक्यातील ही जागा. प्रतापगड ला जाण्याची एकच वाट रणतोंडीची वाट ज्या वाटेवरून जाताना तोंड रडल्यासारखंच होणार अशी ही वाट. इतकी नैसर्गिक अनुकलता शिवासुत्रासाठी (गनिमीकाव्यासाठी) पुरेशी होती.
उन्मत्त हत्तीला जंगलात खेचून आणून मारायचा डाव लवकरचं फत्ते केला जाणार होता...

११ जुलै १६६७
मिर्झा राजे जयसिंह यांचा बूर्‍हाणपूर येथे मृत्यू.
संदर्भ:- "सह्याद्रीचे अग्निकुंड"
लेखक:-सूरज बबन थोरात
सह्याद्री प्रतिष्ठाण
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment