इतिहासात हरवलेला धारकरी - "संताजी जाधव"

संताजी जाधव हे नाव ऐकले की आपण बुचकळ्यात पडतो . संताजी घोरपडे. मग संताजी जाधव कोण ?
संताजी घोरपडे यांनी आपला आडनाव तर
नाही ना बदलले होते ? असे प्रश्न आपल्याला पडतील तर असे काही झाले नव्हते.
संताजी घोरपडे यांनी भल्या भल्यांना आपले आडनाव बदलायला लावले. ते आपला आडनाव कसे बदलतील. मग कोण
आहे हा संताजी जाधव त्याचे इतिहासातील महत्व काय संताजी जाधव हा धनाजी जाधव यांचा सुपुत्र.संताजी हे नाव धनाजीने आपला मित्र संताजीं च्या नावावर ठेवले. धनाजी
संताजींच्या युद्ध नितीने इतका भारावले होते
कि त्यांनी आपल्या मुलाचे नाव संताजी ठेवले आणि जसा तो वयात आला तसा तो स्वत्त
त्याला घेवून संताजीकडे आले आणि म्हणाला " संता सांभाळ तुझ्या भाच्याला, तुझ्यासारखा पराक्रमी बनव त्याला. आणि तुझे सारे गुण
त्याच्यात उतरव" " धना बेफिकीर रहा सिंहाचा छावा बनवतो त्याला तुलाही बदणार नाही." संताजी त्याला.आपल्या उराशी घेत म्हणाले. संताजी जाधव पिता धनाजी जाधावा प्रमाणे शूर आणि पराक्रमी होता.
चंदान्वंदन च्या लढाईत वाघाप्रमाणे लढला मोघलांनी घेरले तरी हत्यार खाली ठेवले नाही
अंगावर असंख्य जखमा झाल्या मराठ्यांनी याला कसा- बसा रणांगणातून परत आणले पण अंगावर असंख्य जखमांमुळे याचा
मध्यरात्री मृत्यू झाला. साऱ्या रात्रभर संताजी
घोरपडयांनी त्याला आपल्या मांडीवर घेवून
काढली.सकाळी धनाजी गढ चढून वर आले आणि त्यांनी पहिला प्रश्न केला "संता माझा पोर वाघासारखा लढला ना? लढाई अर्धवट सोडून
पळताना तर मारला नाही ना गेला ?" " अरे धना तुझा पोर वाघच होता रे आणि लढाईत पळून यायला तो काय मोघल होता मराठ्यांचा मर्द बच्चा होता जो जिंकण्यासाठी मेला "
संताजी.यानंतर संताजी आणि धनाजींनी खूप लढाया केल्या आणि त्या यशस्वीही करून दाखवल्या नंतर सेनापती या पदासाठी या दोघांच्यात जेव्हा वाद झाले तेव्हा संताजी
एकदा धनाजीला म्हणाला "धनसिंग अरे हे दिवस बघायला तुझा पोरगा संताजी इथे
नाही आहे पण जर तो असता तर तलवार घेवून
पहिली तुझी गर्दन छाटली असती कारण स्वराज्या विरोधात उठणारा प्रत्तेक बोट
वेळीच छाटावा असे मी शिकवले होते. आज जर तो वरुण बघत असेल तर त्याच्या मनाला काय वाटत असेल धनसिंग "खरेच जर
संताजी जाधव शेवटपर्यंत असता तर संताजी
घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यात झालेले वाद झालेच नसते. आणि त्यामुळे त्या औरंग्याला २७ वर्ष महाराष्ट्रात राहूच दिले नसते.....
|| जय भवानी, जय शिवाजी....|
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment