Skip to main content

Posts

Showing posts from September, 2017

।।शूरवीर बाजी पासलकर ।।

।।शूरवीर बाजी पासलकर ।। स्वराज्यासाठी पाहिलं बलिदान देणारे वीर बाजी पासलकर सभासदाच्या बखरीत या युद्धाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. राज्पुरीहून काय सावंत म्हणोन पांच हजार फौजेनिशी युद्धास आला. युद्ध मोठे होतां बहुत रणखंदल जाले. काय सावंत खास व बाजी पासलकर महायोद्धा, याच्या मिश्या दंडायेवढ्या, यांस पीळ घालून वारी केशांच्या आधारे निंबे दोहींकडे दोन ठेवीत होता, असा शुरमर्द ठेविला, याशी व त्याशी खासाखाशी गांठ पडली. एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार मारले. मग उभायान्ताकडील दळ आपले जागीयास गेले. बाजी पासाल्कारांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.  

राष्ट्ररक्षणाच्या इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवराय !

भारताला सहस्रो मैलांचा समुद्रकिनारा लाभला आहे. १ सहस्र वर्षांपूर्वी दक्षिण भारतातील चोल राजांनी त्यांच्या शक्तीशाली नौदलाच्या साहाय्याने पूर्व आशियातील मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया इत्यादी देशांवर वर्चस्व निर्माण करून आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रभाव निर्माण केला होता. कंबोडियातील अकोरवाट येथील जगातील सर्वांत भव्य हिंदु मंदिर आजही त्याची साक्ष देत उभे आहे; मात्र नंतरच्या काळात निर्माण झालेल्या समुद्रबंदीसारख्या अत्यंत घातक रूढीमुळे सागराशी नाते तोडलेल्या भारतियांनी समुद्रावरील वर्चस्व गमावले. त्याचाच परिणाम नंतरच्या काळात याच समुद्रावरून आलेल्या परकीय सागरी सत्तांनी या देशालाच गुलाम केले. उत्तरेकडील खैबरखिंड आणि बोलण खिंडीतून हिंदुस्थानशी होणारा व्यापार थांबल्यावर पोर्तुगीज आक्रमक वास्को-द-गामा याने आफ्रिकेला वळसा घालून हिंदुस्थानच्या समुद्रकिनार्‍यावर येण्याचा नवा मार्ग शोधून ख्रिस्ताब्द १४९८ मध्ये कालिकत बंदरात पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच या युरोपीय सत्तांनी व्यापाराच्या निमित्ताने हिंदुस्थानात येऊन जागोजागी त्यांच्या वसाहती स्थापन केल...

व्हिएतनामचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !

दक्षिण पूर्वेतील व्हिएतनामसारखा छोटा देश आपल्या स्वातंत्र्यासाठी वर्षानुवर्षे अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या जगातील सर्वात बलाढ्य अमेरिकेशी लढत राहिला आणि केवळ छत्रपतींच्या प्रेरणेने जिंकलासुद्धा. छत्रपतींनीही याच गनिमी काव्याचा वापर करून मोघलांना पराभूत केले होते. व्हिएतनामी योद्ध्यांनी तोच धडा गिरवला होता. व्हिएतनाम युद्धातील विजयानंतर तेथील राष्ट्रपतींनी स्वतःच छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा धडा आम्ही गिरवला; म्हणूनच आम्ही बलाढ्य अमेरिकेला नमवू शकलो ! असे उद्गार काढले होते. व्हिएतनाम हा एक असा देश आहे की, त्याने हिंदुस्थानकडून जी प्रेरणा घेतली, त्याचा एक इतिहासच आहे. व्हिएतनाम आणि अमेरिकेत २० वर्षे युद्ध चालले. अमेरिकेला वाटत होते की, या देशाला नष्ट करण्यासाठी अगदीच थोडा वेळ लागेल. केवळ काही घंण्टेच पुरे होतील; परंतु व्हिएतनामचे युद्ध अमेरिकेला चांगलेच महागात पडले; कारण व्हिएतनामी योद्ध्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून त्यांची युद्धनीति अवलंबली होती. व्हिएतनाम या युद्धात विजयी झाल्यानंतर त्यांच्या राष्ट्रपतींना पत्रकारांनी या विजयाचे रहस्य विचारले, ...

आजही हवेत छत्रपती शिवाजी महाराज !

१. छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्कृष्ट नेतृत्व गुण ! १ अ. युद्धप्रसंगातील नियोजनकौशल्य ! : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अभ्यास आणि नियोजनयांच्याविना एकही गोष्ट केली नाही. शाहिस्तेखानावर आक्रमण करण्यासाठी लाल महालात केवळ ५०जण गेले होते. तेव्हाही १,३५,००० विरुद्ध १२,००० हे प्रमाण होते. अफजलखानाच्या वेळी तर १० सहस्रविरुद्ध ३६ सहस्र हे प्रमाण होते. कोंडोजी फर्जदांचा पन्हाळ्याचा संग्राम असो कि शिवा काशीद अन्बाजीप्रभू देशपांडे यांचा पावनखिंडीतला पराक्रम असो, हे सर्व प्रसंग त्यांचे उत्तम नियोजन सांगतात ! १ आ. माणसांची उत्तम पारख : छत्रपती शिवाजी महाराजांनी बोरू आणि समशेर यांना समानसमजले. त्यांना उत्तमपणे माणसांची पारख होती. पळी-पंचपात्री हातांत घेणारी माणसे (ब्राह्मण) परराष्ट्रखात्याचे वकील म्हणून उभे झाले. बाजीप्रभु देशपांडे यांच्यासारखे आदिलशाही सोडून महाराजांना येऊनमिळाले. त्यांनी महाराजांमध्ये काय पाहिले ? संभाजी कावजी कोंढाळकर, बहिर्जानाईक यांच्यासारखीपहिल्यांदा सामान्य वाटणारी माणसे नंतर असामान्य कर्तृत्व कशी गाजवून गेली ? असे कितीतरी मावळे,कितीतरी सरदार आहेत. त्यांना स्वर...

छत्रपती शिवाजी महाराजांची अदात्त आणि आशयघन राजमुद्रा

प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता । शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। अर्थ : प्रतिपदेचा चंद्र कसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला विश्ववंदनीय होतो, तशी शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्वाला भद्र, म्हणजे कल्याणकारी वाटते. शिवमुद्रेचा रचयिता इतिहासाला ज्ञात नसणे या मुद्रेवरील आशयगर्भ श्लोकाचा कर्ता कोण, रचविता कोण हे अंदाजाने काही सांगितले जाते. कोणी म्हणतात, शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांनीच तो खोल आशयाचा श्लोक रचला असावा. कोणाला वाटते समर्थ रामदासस्वामींचीच ती रचना असावी. रामचंद्रपंत अमात्यांनी, तर राजव्यवहार कोश लिहिला. शिवमुद्रेवरील आशय लिहिणे त्यांना काय कठीण ! कोणाला असाही तर्क लढवावासा वाटतो की, काशीचे प्रकांड पंडित गागाभट्ट यांचीच ही रचना असणार ! हे इतके विकल्प कसे सोडवायचे ? अर्थ एवढाच की, शिवमुद्रेचा रचविता इतिहासाला ज्ञात नाही. शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्वाला कल्याणकारी वाटणे शिवमुद्रेवरील दोन ओळींचा तो श्लोक अर्थगर्भ तर आहेच; पण तो एक साहित्यालंकारही आहे. आजवर राजमुद्रा कितीतरी झाल्या; परंतु...

मराठी भाषेतून राज्यकारभार चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज !

१. ‘पेशवा, सुरनीस, सरनौबत, मुजुमदार अशा असंख्य परकीय शब्दांऐवजी पंतप्रधान, सचिव, सेनापती, अमात्य, असे आपले शब्द रूढ होत गेले. २. मातृभाषा हा राष्ट्राचा प्राण आहे. भाषा म्हणजे राष्ट्राची संजीवनीच ! ३. मराठीत प्रचलीत झालेले परकीय शब्द : ‘संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्त झाले व यादव रामराज्य बुडाले, तेव्हापासून मराठी भाषेवर यवनांचे आक्रमण होऊ लागले. इतकेच नव्हे, तर आम्हाला या परकीय नावारूपांचा अभिमान वाटू लागला. अ. पुढे पुढे आमची नावे व आडनावेही पुसली जाऊ लागली. सुलतानराव, रुस्तमराव, हैबतराव, बाजीराव, शहाजी, पिराजी अशी नावे आली. आ. वैदिक शास्त्री म्हणवून घेणार्‍यांनीही सुलतानभट, होशिंगभट अशी नावे स्वीकारली.’ ४. शिवसन्निध काळातील ‘मराठी’ पत्र : ‘शिवसन्निध काळातील शाही हुकुमनामे व अन्य पत्रव्यवहार वाचले, तर बुद्धी अवाक् होते. उदाहरणार्थ हे ‘मराठी’ पत्र पहा. ‘अजरख्तखाने शहाजीराजे दाम दौलतहु बजाने कारकुनानी व हवालदारांनी हाल व इस्तकबाल …वगैरा वगैरा.’ या पत्रातील काही शब्दच मराठी आहेत. पत्राचे व्याकरण, त्यातील मराठी प्रत्यय, कर्ता, कर्म, क्रियापद सुदैवाने अर्थ समजण्याइतपतच वाप...

इंग्रजांना धडा शिकवणारे शिवाजी महाराज !

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वस्तूंची सूची पाहिल्यास त्यामध्ये ‘खोबर्‍या’च्या प्रकाराच्या सूचीत ‘राजापुरी खोबरे’ असे स्वतंत्र नाव त्यात नमूद केलेले असते. ब्रिटीश व्यापार्‍यांची राजापूरला वखार होती. त्यांनी तेथील व्यापार्‍यांना हाताशी धरून त्यांना पैसे चारले आणि आपल्या शेतकरी बांधवांकडून ते अत्यंत पडेल भावाने हे खोबरे खरेदी केले. तेव्हा दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. शेतकर्‍यांकडे त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा याकरता माल दुसर्‍या बाजारात पाठवण्याइतपत त्यांची आर्थिक कुवत नव्हती. म्हणून ते हतबल होते. त्यांना प्रचंड हानी सहन करावी लागली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पत्र लिहून याबाबत कळवले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ताबडतोब इंग्रजांकडून जो माल महाराजांच्या मुलुखात येत होता, त्यावर २०० टक्के दंडात्मक आयात शुल्क बसवले; जेणेकरून इंग्रजांच्या मालाची किंमत वाढून तो विकला जाऊ नये. या प्रकारामुळे इंग्रजांची तारांबळ उडाली. त्यांच्या मालाची विक्री कमी झाली. त्यामुळे इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिले की, आमच्यावर दया करा, सीमाशुल्क कमी करा. छत्रप...

शिवरायांची युद्धनीती

महान सेनानी ! – औरंगजेब ‘प्रत्यक्ष औरंगजेबाने छ. शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या मृत्यूनंतर काढलेले हे उद्गार, ‘‘ते एक महान सेनानी होते. त्यांनी आपल्या कल्पकतेने आणि शौर्याने एक नवीन राज्य निर्माण केले. हिंदुस्थानातील प्राचीन राज्यांचे उरलेसुरले अस्तित्व मी माझ्या प्रचंड सेनादलांच्या साहाय्याने गेली १९ वर्षे नष्ट करण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांचे बळ मात्र वाढतच होते.’’ हुशार आणि लष्करी डावपेचात निष्णात ! – गोव्याचा गव्हर्नर गोव्याचा गव्हर्नर आणि कॅप्टन जनरल अंतोनियो पाइश द सांद याने शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यातील युद्धाचा एक अहवाल पोर्तुगालच्या सागरोत्तर मंडळाला पाठवला आहे. त्यात तो म्हणतो, शिवाजीराजे यांनी गोव्यापासून दमणपर्यंतच्या आमच्या सीमेला (सरहद्दीला) लागून असलेला प्रदेश घेतला असून सांप्रत ते मुघलांशी युद्धात गुंतलेले आहेत. हा हिंदुस्थानचा नवा ‘अ‍ॅटिला’ इतका हुशार आणि लष्करी डावपेचात इतका निष्णात आहे की, तो बचावाचे आणि चढाईचे युद्धही तितक्याच कुशलतेने खेळतो. तो मुघल प्रदेशात घोडदळ पाठवून प्रदेश जाळून बेचिराख करत आहे. शिवाजी महाराजांची तुलना सर्...

व्यवस्थापनाची तत्त्वे आणि छत्रपती शिवाजी महाराज

श्रावण शु. चतुर्थी, कलियुग वर्ष ५११२ (१३.८.२०१०) या दिवशी ‘T. Y. B.C.A.’ या वर्गात व्यवस्थापनाची तत्त्वे (Principals of Management) हा विषय शिकवत असतांना छत्रपती शिवरायांची दिलेली उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. अ. Forecasting’ (पूर्व अंदाज) शिकवतांना शिवरायांच्या स्वराज्याचे ‘कान-नाक-डोळे’ म्हणून ओळखले जाणारे ‘बहिर्जी नाईक’ यांचे उदाहरण दिले. आ. Planning (नियोजन) शिकवितांना हिंदवी स्वराज्याचे दूरदर्शी नियोजन करत महाराष्ट्रात ३५० गड बांधणार्‍या शिवरायांचे उदाहरण दिले. इ. Decision Making (निर्णय घेणे) हे तत्त्व शिकवितांना छ. शिवरायांनी अफजलखान वध, प्रसंगी मिर्झाराजे जयसिंग याच्याशी तह करण्याचा घेतलेला निर्णय, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा इंग्रजांच्या नजर कैदेतून सुटण्याचा निर्णय यांची उदाहरणे दिली. ई. Leading (नेतृत्व) शिकवितांना सूत्र अधिक स्पष्ट करण्यासाठी पुढील वाक्य वापरले – ‘‘Ch. Shivaji Maharaj was the great Leader in the Indian History; पण औरंगजेबाला तसा नेता होता आले नाही. नेत्याचे सर्व गुण छ. शिवाजी महाराजांमध्ये होते; पण आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, ...

छ. शिवरायांसारखा आदर्श राजा आणणे, हाच खरा ‘शिवराज्याभिषेक दिन !’

विद्यार्थीमित्रांनो, ज्येष्ठ शु. त्रयोदशी, कलियुग वर्ष ५११५या दिवशी ‘शिवराज्याभिषेक दिन’ असतो. आजच्या राज्यकर्त्यांची मानसिकता पाहिल्यावर शिवरायांसारख्या राजाचीच आपल्याला का आवश्यकता आहे, हे लक्षात येईल. शिवरायांसारख्या राजामुळेच राष्ट्र आणि धर्म यांचे, म्हणजेच पर्यायाने आपलेसुद्धा रक्षण होईल. मित्रांनो, आज आपण पहातो की, राज्यकर्ते कोट्यवधी रुपयांची राष्ट्रीय संपत्ती लुबाडत आहेत. आज भ्रष्टाचारी, चारित्र्यहीन आणि अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेले राज्यकर्ते राज्य करत आहेत. असले दुर्गुणी राज्यकर्ते आपले आणि आपल्या राष्ट्राचे रक्षण करतील का ? त्यामुळेच त्यांची हकालपट्टी करून शिवरायांसारखे राज्यकर्ते आणण्याचा निश्चय करणे, हाच खरा शिवराज्यभिषेक दिन होय. १. देव, देश आणि धर्म संकटात असतांना छ. शिवरायांच्या रूपात हिंदूंना वाली मिळून प्रजेचे दैन्य दूर होणे शिवरायांचा राज्यभिषेक होण्यापूर्वी आपल्या माता-भगिनी सुरक्षित नव्हत्या. स्त्रियांवर अनेक अत्याचार होत होते. त्यांना कोणी वालीही नव्हता. हिंदूंचे बळजोरीने धर्मांतरणही केले जाई, म्हणजे त्या काळातही आपले देव, देश, धर्म इत्यादी सर्...

छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून त्याप्रमाणे कृती करणे, हीच खरी शिवजयंती !

‘विद्यार्थी मित्रांनो, आपण आता तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार आहोत. जयंती साजरी करणे, म्हणजे केवळ पोवाडे लावणे किंवा एखादा गाण्याचा कार्यक्रम करणे एवढ्यापुरते मर्यादित आहे का ? खर्‍या अर्थाने शिवजयंती साजरी करणे, म्हणजे शिवरायांचे गुण आपल्या अंगी बाणवण्याचा निश्चय करणे होय. सध्या याला एका उत्सवाचे स्वरूप आले आहे. आपल्याला यामध्ये पालट करायचा आहे; कारण शिवरायांसारखे आदर्श जीवन जगणे, ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आदर्श युगपुरुषाला घडवणारी त्यांची जीवनपद्धत आणि आपली जीवनपद्धत खेळ खेळणे मर्दानी खेळांमुळे लढाऊवृत्ती निर्माण होणे : शिवराय पटांगणात खेळ खेळत. कुस्ती, दांडपट्टा, घोड्यावर स्वार होणे, तलवार चालवणे अशा खेळांमुळे त्यांच्यात निर्भयता, क्षात्रवृत्ती, अन्यायाविरुद्ध चीड, लढाऊवृत्ती, तसेच नेतृत्वगुण असे अनेक गुण निर्माण झाले. मित्रांनो, गुणच आपल्या जीवनाचा पाया आहे; म्हणून आपण प्रत्यक्ष मर्दानी खेळ खेळलो, तरच आपल्यात गुण येतील. काल्पनिक खेळांमुळे विध्वंसकतेकडे वाटचाल होत असल्याने त्यांवर बहिष्कार टाकणे आवश्यक : सध्या मुले संगणक...

शिवराज्याभिषेक

शिवाजीराजांचा राज्याभिषेक         तक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली. जडित सिंहासन सिद्धं केले, रायरीचे नाव ‘ रायगड ’ म्हणून ठेविले. तक्तास स्थळ तोच गड नेमीला. गडावरी तक्ती बसवावे असे केले. सप्तमहानदियांची उदके व थोर थोर नदियांची उदके व समुद्राची उदके, तीर्थक्षेत्रे नामांकित तेथील तीर्थोदके आणिली. सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजियांस अभिषेक करावा असा निश्चय करून, सुदिन पाहून मुहूर्त पाहिला. ‘शालीवाहन शके १५९६, ज्येष्ठ मासी शुद्ध १३स मुहूर्त पाहिला.’         साडेचार् हजार राजांना निमंत्रणे गेली. रायगडावर साडेचार हजार राजे जमले. गागाभट्टानि पवित्र साप्तनद्यांचे पाणी आणले. राजे ब्रम्हा मुहूर्तावर उठले, स्नान केले, शिवाई मातेला अभिषेक केला आणि जिजाऊ मातांचे दर्शन घेतले. कवड्यांच्या माळा घातल्या, जिरेटोप डोक्यावर घातला, भवानी तलवार कंबरेला जोडली आणि राजे गड फिर...

छत्रपती शिवाजी महाराज : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता !

हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा… असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिम...