गड मी राजाचे गाईन , कोहज माहुली मर्जन | पारगड कर्नाळा , प्रबळगड आहे संगिन || मस्त तळा आणि घोसाळा ,रोहरी आनसवाडी दोन | कोरला कासागड मंडन , दर्यात दिसताती दोन || गड बिरवाडी पाचकोन , सुरगड अवचितगड भूषण | कुबलगड भिरिका , कुर्डुगडाचे चांगुलपण , धोडप तळकोकणचे किल्ले , घाटावरचे गड गाईन || गड आहे रोहिडा जीवला (जावळी ) प्रतापगड मंडन | मकरंदगड वासोटा ,सिंहगड वृंदावन , पुरंधराचे चांगुलपण , उंची झुलवा देत गगन , सोन्याची सुवेळा आहे , राजगड संगीन || कोंढाण्यापासुन तोरणा वर्ता , कोर रेखिली घाटमाथा | तुंग आणि तिकोना , विसापूर लोहगड झुलता , गड राहेरीची अवस्था , तीन पायऱ्या सोन्याच्या तक्ता , दुसरा प्रतापगड पाहता , अवघड दिसे घाटमाथा ||