भूषणा बद्दल एक आख्यायिका(दंतकथा) आहे की तो रायगडावरून परत उत्तरेत
गेल्यावर तो शिवाजी महाराजांच्या स्तुतीचे छंद म्हणू लागला. हा सर्व प्रकार
औरंगजेब ला समजल्यवर त्याने चिंतामणी या भूषणाच्या भावाच्या मध्यस्तीने
भूषणास दरबारात बोलवले व औरंगजेब म्हणाला शिवाजी हा राजा आहे त्याचे
मांडलीक राजांतच वर्णन कर. पण भूषण हा प्रतिभावंत कवी होता. त्याने
औरंगजेबाच्या ऐकेका मनसबदाराला एक एक फूलाची उपमा दिली व औरंगजेब भूंग्या
सारखा या सर्व फूलांतून मध जमा करतो पण शिवाजी राजे हे चाफ्याच्या फुला प्रमाणे
आहेत चाफ्यात मध नसत म्हणून भूंगा त्याच्या वाटेला जात नाही तद्वतच
औरंगजेब शिवरायांच्या वाटेला कधी जात नाही असे वर्णन केले. भूषणा ने
म्हटले. कछवाहे म्हणजे जयपूरचे राजे कमळा प्रमाणे, कबंधज म्हणजे जोधपूरचे
राजे कदंबाप्रमाणे, गौर गुलाबा प्रमाणे, राणा म्हणजे उदेपूरचे राणे
केतकीपुष्पाप्रमाणे, पवार पांढरीच्या फुलाप्रमाणे, चंदावत जूईच्या
फुलासारखे, बुन्देले चमेलीप्रमाणे, बडगुजर मुचुकुंद प्रमाणे तर बघेले
वसंतकाली फुलणा-या सर्व पुष्पसमुहाप्रमाणे आहेत. औरंगजेबरूपी भ्रमर ह्या
सर्व फुलांतून रसपान करतो म्हणजे चौथाई घेतो पण शिवराय हे चाफ्याच्या फुला
सारखे आहेत त्यामूळे औरंगजेब त्यांच्या वाट्याला कधी जात नाही.

0 comments:
Post a Comment