_____मोरोपंतांच्या देखरेखीखाली राजगडचे बांधकाम चालु होते.राजधानीचा गड, स्वराज्याची सुरुवात.या मुरुंबदेवाच्या डोंगरास खणत्या,पहारी लागल्या.श्री गणेशा झाला.राजधानीचा गड नव रुप घेऊ लागला.गडावरील इमारती,तट,बुरुंज यांना लागणारा दगड हा डोंगरावरील अनावश्यक भागास खणत्या,पहारी लावुन फोडुन उपलब्ध केला जाऊ लागला.राजगडाच्या तिन्ही माच्या संरक्षित केल्या जात होत्या.मोरोपंतांनी किल्ले राजगडाची पश्चिमेकडील माची वैशिष्ट पुर्ण बांधली.पश्चिमेकडील एक दीड मैल लांबीच्या डोंगरसोंडेवर अंती हेच बांधकाम दुहेरी केलेले आहे आणि जागोजागी असलेल्या बुरुजांचे बांधकामही दुहेरी केलेले आहे.अगदी शेवटी एका मुलभूत खडकावर बिनिचा बुलंद बुरुंज बांधलेला आहे.जागोजागी पाण्याची टाकी,शिबंदीची घरे,चिलखती तट,चिलखती बुरुंज,आळ दरवाजा,जुंझार बुरुंज,दैवत स्थाने,तटसरनोबत सदर,पायखाने इत्यादी बांधकामांनी ती माची सजली,संरक्षित केली. _____किल्ले मुरुंबदेवाच्या सन १६४८ ते १६६३ या बांधकामाच्या कालावधीत हिरामण बेलदाराची पालें त्या राजगडाच्या आसमंतात असणार्या गुंजवणी नदीकाठी पडली.राजगडाचे बांधकाम सुरु झाले.वास्तुविशारदाच्या देखरे...