Skip to main content

Posts

Showing posts from September, 2018

छत्रपती शिवाजी महाराज की पुरी कहानी | Full story of chhatrapati Shivaji Maharaj Hindi

Top 12 Raje Shivaji - Chhatrapati Shivaji Maharaj Songs - Sumeet Music

Chhatrapati Shivaji Maharaj Rajmudra ll राजमुद्रा ll with Meaning

औरंगजेबाने केलेला दाराचा शेवट.

२५ मे १६५८ रोजी औरंगजेब आणि त्याचा भाऊ दारा शिकोह याचे वारसहक्कासाठी समूगढ येथे लढाई झाला ज्यामध्ये दाराचा पराभव झाला पण दाराने तेथून पळ काढला . आणि पुढे काही दिवसांच्या पाठलागानंतर अखेर दारा औरंगजेबाच्या हाती सापडला. ५ जून १६५९ रोजी औरंगजेबाने स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला आणि ९ जून रोजी दारा आणि सिपाहर शिकोह या दोघांना कैद केले. दारा पकडल्यागेल्यानंतर दाराला पूर्ण कल्पना होती कि आपण मारले जाणार आहोत. औरंगजेबाने दारासोबत केलेल्या सर्व प्रसंगाचे वर्णन मनुचीने आपल्या " स्टोरियों द मोगोर " या ग्रंथात केली आहे तो लिहितो.. दाराच्या देहांताच्या शिक्षेचा हुकूम काढण्यापूर्वी औरंगजेबाने त्याला निरोप पाठवून असे विचारली कि " दैव आज तुला जितके प्रतिकूल झाले आहे , तितकेच अनुकूल झाले असते आणि मला ( औरंगजेबाला ) तू कैद केले असतेस तर तू काय केले असतेस ? " काही जरी झाले तरी औरंगजेब आपल्याला जिवंत ठेवणार नाही आणि हा प्रश्न आपला उपहास करण्यासाठीच विचारलेला आहे हे दारास ठाऊक होते. दाराने राजपुत्र या दृष्टीने आपल्या व्यक्तित्वास साजेसे उत्तर दिले , ...

विकृती, प्रकृती आणि संस्कृती

विकृती, प्रकृती आणि संस्कृती ह्या तीनही संकल्पना तशा एकाच मुल तत्वावर आधारीत आहेत. व ते मुल तत्व म्हणजे निसर्गनियम होय. वेगवेगळ्या संदर्भात ह्या संकल्पनांची उकल करता येईल. दोन तीन वर्षापुर्वी आमच्या घरच्या झाडाचे आंबे उतरवायचे काम सुरु होते. मी झाडावर चढलो होतो व टिपुन एकेक आंबा काढत होतो. झाडाच्या एका फांदीला आता शंभरेक आंबे शिल्लक होते. इतक्यात आई म्हणाली आता बास झाले. राहीलेले आंबे झाडाला तसेच राहुदे. मी का असे न विचारताच झाडावरुन खाली उतरलो. व आंबे पिकवण्याची आढी लावुन झाल्यावर आईला विचारले झाडाला आंबे ठेवायला का सांगितलेस तु मला? त्यावर आई म्हणाली की आपण सगळेच्या सगळे आंबे काढायचे नसतात. झाडावर येणा-या पक्षांना प्रसंगी प्राण्यांना खाण्यासाठी हे आंबे असेच ठेवायची पध्दत पुर्वापार असेल खेड्यापाड्यात. यात संस्कृती पाहायला मिळते. सर्वच्या सर्व आंबे काढणे व ते खाणे किंवा विकणे ही विकृती आहे. व जेवढी भुक आहे तेवढेच आंबे काढुन खाणे ही प्रकृती आहे. पण या एका प्रसंगात संस्कृतीची खुण दिसते. ही संस्कृती देखील सह्याद्रीचे अंगभुत वैशिष्ट्य आहे. एखादा समाज किती सुसंस्स्कृत आहे हे...

प्लासीचे युद्ध आणि पुण्याचा त्रिशुंड गणपती !

आज आषाढ शुद्ध षष्ठी, २६१ वर्षापुर्वी आजच प्रसिद्ध प्लासीचे युद्ध झाले आणि इंग्रजी सत्तेचा पाया भारतात मजबूत झाला. पुण्यातील सोमवार पेठेत असलेल्या त्रिशुंड गणपती मंदिर आणि बंगालमध्ये खेळलेली प्लासी (पलाशी) ची लढाई यात संबंध कसा, यासाठी हा लेखप्रपंच. पुण्यात गोसावी लोकांची वस्ती नागेश्वर मंदिराजवळ होती. त्याला गोसावीपुरा म्हणत. हा व्यापारी व सावकारी करणारा समाज होता. त्यांच्या प्रथेप्रमाणे मृत व्यक्तीची समाधी किंवा शिवमंदिर बांधली जातात जी आजही सोमवार पेठेत बघायला मिळतात. असच एक शिवमंदिर (सद्या गणेश मंदिर) 'भीमगिरजी' या संपन्न गोसावी ने बांधले, त्यांची समाधी तळघरात आहे. या मंदिराची उभारणी १७५४ ला सुरु होउन १७७० ला पुर्ण झाली. संपुर्ण मंदिर एकसंघ दगडातुन तयार केलाय. गाभार्यात मयुरावर तीन सोंड असलेली सुंदर गणेश मुर्ती विराजमान आहे तर गाभार्यावरती संस्कृत-मराठी-फार्सी भाषेतील शिलालेख आहेत. एखाद्या लेण्याप्रमाणे वाटणारे हे मंदिर तसं उपेक्षीतच आहे. मंदिराचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे प्रवेशदाराच्या भोवतीच सुरेख कोरीव काम आणि त्याचा पलाशीच्या युद्धाशी असणारा संबंध...

सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती

माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेण्याचे भाग्य लाभले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांनाच मोहीत केलेले दिसते. “वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती” म्हणत एकांताचा वास निसर्गाच्या सानिध्यात घेताना “आपुलाची वाद आपणासी” अशी स्वःतच्या अंतर्मनास साद घालणारे तुकोब्बा राय असो किंवा सह्याद्रीच्या कड्याकपा-यांतुन वाहणा-या जलप्रपातांच्या घळयांतुन साधना करणारे समर्थ रामदास असोत, किंबहुना सगळ्याच संत महंतांस या सह्याद्रीने, या निसर्गाने आकर्षित केलेले आपणास दिसते आहे.