औरंगजेबाने केलेला दाराचा शेवट.

२५ मे १६५८ रोजी औरंगजेब आणि त्याचा भाऊ दारा शिकोह याचे वारसहक्कासाठी समूगढ येथे लढाई झाला ज्यामध्ये दाराचा पराभव झाला पण दाराने तेथून पळ काढला . आणि पुढे काही दिवसांच्या पाठलागानंतर अखेर दारा औरंगजेबाच्या हाती सापडला.
५ जून १६५९ रोजी औरंगजेबाने स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला आणि ९ जून रोजी दारा आणि सिपाहर शिकोह या दोघांना कैद केले.
दारा पकडल्यागेल्यानंतर दाराला पूर्ण कल्पना होती कि आपण मारले जाणार आहोत.
औरंगजेबाने दारासोबत केलेल्या सर्व प्रसंगाचे वर्णन मनुचीने आपल्या " स्टोरियों द मोगोर " या ग्रंथात केली आहे तो लिहितो..
दाराच्या देहांताच्या शिक्षेचा हुकूम काढण्यापूर्वी औरंगजेबाने त्याला निरोप पाठवून असे विचारली कि " दैव आज तुला जितके प्रतिकूल झाले आहे , तितकेच अनुकूल झाले असते आणि मला ( औरंगजेबाला ) तू कैद केले असतेस तर तू काय केले असतेस ? " काही जरी झाले तरी औरंगजेब आपल्याला जिवंत ठेवणार नाही आणि हा प्रश्न आपला उपहास करण्यासाठीच विचारलेला आहे हे दारास ठाऊक होते. दाराने राजपुत्र या दृष्टीने आपल्या व्यक्तित्वास साजेसे उत्तर दिले , " अशी परिस्थिती आली असती तर तुझ्या शरीराचे चार तुकडे करून दिल्लीच्या चार दरवाजाच्या पुढे उघडे फेकून देण्यास सांगितले असते.."
हे ऊत्तर औरंगजेबास कळविण्यात आले . असल्या अवज्ञेबद्दल व फाजील मोकळीक घेतल्याबद्दल तो अतिशय संतापला , त्याने आपल्या सर्वात वडील भावास देहांताची शिक्षा फर्मावली . हे कृत्य कोण करू शकेल असे विचारल्यावर हे भयंकर आणि अतिशय धोक्याचे काम करण्याची तयारी " नसर ( नझरबेग चेल्हा) बेग " याने दाखविली.
तो शहाजहानाचा गुलाम असून त्याच्या पदरीच तो वाढला होता. आपल्या बरोबर त्याने सात माणसे घेतली ती अशी :- मकबूल , मूहर्रम , मशहूर, असारून, फुसाद, मुराद आणि फत्तेबहाद्दूर हे होत. हे सर्व दरबारातून निघाले , त्यानंतर लोकांची फसवणूक करण्याकरता औरंगजेबाने सैफ खानाबरोबर चार हजार घोडेस्वार , स्वयंपाकाची भांडी व प्रवासाला लागणाऱ्या इतर वस्तू लादलेले उंट तयार ठेवण्यास सांगितले सगळीकडे जाहीर मात्र असे केले कि सैफखान लवकरच दाराला ग्वाल्हेरच्या किल्ल्यात घेऊन जाणार आहे.
शिरच्छेद करण्याकरिता आलेले हे लोक खिजरबागेत संध्याकाळी सात वाजता येऊन पोहोचले . त्यांनी दारावर हात टाकला आणि काहीही दयामया न दाखविता त्याला खाली पडून त्याचे डोके कापले . धड तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडू देऊन ते शीर घेऊन झटपट औरंगजेबाकडे गेले. त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते तो राजवाड्याच्या बागेत होता , शहाजहानचा लाडका मोठा मुलगा आणि मोगल साम्राज्याचा युवराज , लोकांना आदरणीय असलेला असा हा दुर्दैवी राजपुत्र दारा. त्याचा असा हृदयद्रावक रीतीने शेवट झाला.
दाराचे शीर येऊन पोहोचले आहे हे औरंगजेबाला समजताच त्याने ते एका थाळीत घालून बागेत आणण्यास सांगितले. तत्पूर्वी चेहऱ्यावरील व पागोट्यावरील रक्त साफ करून घेतले दिवे आणण्यास सांगितले. त्याच्या प्रकाशात राजपुत्र दाराच्या कपाळावरच्या खुणा तपासून पहिल्या . कारण त्याला खात्री करून घ्यावयाची होती कि हे शीर दाराचें आहे दुसऱ्या कोणाचे आहे. त्याची खात्री झाली कि मग त्याने ते खाली जमिनीवर ठेवण्यास सांगितले . आपल्या हातातील तलवारीने त्याने शिराला तीन वेळा डिवचले. औरंगजेबाने गुप्तपणे आज्ञा केली कि ते शीर पेटीत ठेऊन शहाजहानच्या कैदखाण्यावरील अधिकारी इतिबारखान यांच्याकडे पाठविण्यात यावे.
शहाजहान दारावर अतिशय प्रेम करीत असे त्या उलट औरंगजेबाला तो विचारीतही नव्हता. त्याचा सूड उगविण्यासाठी औरंगजेबाने वरील मसलत केली. जणू काय शहाजहानाला त्याला म्हणायचे होते " पहा , तुमच्या लाडक्याचा शेवट. तुम्ही ज्याला तुच्छ लेखत होता , तो आता साम्राज्याचा अधिकारी आहे आणि तुमचा आवडता दारा मृत्यू पावला आहे"
त्या रात्री औरंगजेबाची लाडकी बहीण रोशन आरा बेगम हिने मोठी मेजवानी दिली.
चित्र- मनुची संग्रह
संदर्भ - असे होते मोगल
- निकोलाय मनुची
-- संकलन
संतोष अशोक तुपे
Image may contain: 1 person
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment