मागच्या वर्षी नागराज मंजुळेंनी " सैराट " हा मराठी चित्रपट प्रदर्शित केला.. अनेक नविन प्रयोग या चित्रपटात केले गेले. या चित्रपटाने उत्पन्नाचा उच्चांग गाठत चित्रपट सुष्टीत नवा इतिहास रचला..हा चित्रपट खुपच सुंदर....वादच नाही.. परंतू एक पुरातन शस्त्रसंग्राहक या नात्याने मला खटकणारी गोष्ट म्हणजे चित्रपटात पाटीलाच्या मुलाने तलवारीने केक कापणे होय..याचेच अनुकरण करीत प्रविण तरडे य ांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "मुळशी पॅटर्न" यात तलवारीने ( घाणेरड्या) पद्धतीने केक कापून कहरच केला... ज्या राजाने ( महाराजांनी ) स्वराज्य स्थापनेसाठी शस्त्रे कशी असावी व कोणत्या प्रसंगी त्याचा वापर योग्य पद्धतीने कसा करावा याचा अत्यंत सृक्ष्मपणे अभ्यास करून ते रणांगणात उपयोगात आणले असा या 'शिवबांचे' नाव आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात "सर्वात्तम राजा "म्हणून आदराने घेतले जाते... कारण त्याचा असलेला शस्त्र व दुर्ग अभ्यास होय..महाराजांच्या पुढे त्या समयी मोगल, अदिलशाहा, डच, इंग्रज व पोर्तुगीज इ. शत्रू असूनही कठीण प्रसंगी अतिशय संयमाने( नियोजन बध्दतेने) आणखी...
Chhatrapati Shivaji Maharaj photos and history.