केक कापण्यासाठी तलवारीचे वापर करणे कितपत योग्य....

मागच्या वर्षी नागराज मंजुळेंनी " सैराट " हा मराठी चित्रपट प्रदर्शित केला.. अनेक नविन प्रयोग या चित्रपटात केले गेले. या चित्रपटाने उत्पन्नाचा उच्चांग गाठत चित्रपट सुष्टीत नवा इतिहास रचला..हा चित्रपट खुपच सुंदर....वादच नाही..
परंतू एक पुरातन शस्त्रसंग्राहक या नात्याने मला खटकणारी गोष्ट म्हणजे चित्रपटात पाटीलाच्या मुलाने तलवारीने केक कापणे होय..याचेच अनुकरण करीत प्रविण तरडे यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "मुळशी पॅटर्न" यात तलवारीने ( घाणेरड्या) पद्धतीने केक कापून कहरच केला...
ज्या राजाने ( महाराजांनी ) स्वराज्य स्थापनेसाठी शस्त्रे कशी असावी व कोणत्या प्रसंगी त्याचा वापर योग्य पद्धतीने कसा करावा याचा अत्यंत सृक्ष्मपणे अभ्यास करून ते रणांगणात उपयोगात आणले असा या 'शिवबांचे' नाव आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात "सर्वात्तम राजा "म्हणून आदराने घेतले जाते... कारण त्याचा असलेला शस्त्र व दुर्ग अभ्यास होय..महाराजांच्या पुढे त्या समयी मोगल, अदिलशाहा, डच, इंग्रज व पोर्तुगीज इ. शत्रू असूनही कठीण प्रसंगी अतिशय संयमाने( नियोजन बध्दतेने) आणखी करत या स्वराजाची उभारणी केली.
त्यात नक्कीच पट्टा, विटा, विविध प्रकारचे तलवारीचे या शस्त्रांचा मोलाचा वाटा होता हे निर्विध्यात सत्य होय...
दोन महिन्यांपूर्वी लातूरला शस्त्रप्रर्दशासाठी जाणे झाले.त्या भागातील एका खेड्यातील तरूण प्रदर्शन बघून माझ्या कडे आला आणि आपल्याजवळील असलेल्या पूर्वजांच्या तलवारीबद्दल गोडवे गावू लागला..त्याने मला अतिशय अभिमानाने सांगितले की तो ती तलवार वर्षातून एकदाच बाहेर काढतो( मला वाटले दसरा पूजनास) परंतू त्याने जे सांगितले ते उत्तर माझ्यासाठी खुप निराशाजनक होते.. हे महाशय त्यांच्या पूर्वजांनी रणांगणात वापरलेले शस्त्र आपल्या जन्मदिनाच्या दिवशी केक कापण्यासाठी वापरत असे...
आज दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने.....संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर फक्त आठ ते नऊ पुरातन शस्त्र संग्रहकांची नावे समोर येतील. ज्यांनी आपले आयुष्य पणास लावून हे शस्त्र संग्रहीत केला आहे.कारण जुने शस्त्र मिळविणे व जतन करणे हे अतिशय अवघड काम होय.आणि हेच ते मुठभर मावळे शस्त्रांच्या प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून तरूण पिढीसमोरील त्याचे प्रदर्शने भरावीत आहेत.
अठराशे अठरा साली भारतातील शेवटचे संस्थान ( मराठा) बुडाले.मराठ्यांनी पुन्हा आपल्या विरूध्द बंड करू नये म्हणून इंग्रजांनी सर्वसामान्यांच्या घरात शस्त्र ठेवण्यास बंदी घातली. अनेक शस्त्रे इंग्लंडला गेली.दुदैर्वाची गोष्ट म्हणजे ज्या इंग्लंड या देशाचा इतिहास चारशे ते पाचशे वर्षाच्या आधी जात नाही त्यांनी अनेक दुर्मिळ चिजा आपल्या भूमीतून नेवून जगातील सर्वात्तम अशा 'ब्रिटिश म्युझियम'मध्ये प्रदशिर्त करण्यात आले...त्यात शिवरायची तलवारीचासुध्दा समावेश आहे.
आज मी सांगितलेल्या वरील चित्रपटातून जर आपल्या शस्त्रांचा अशा अवमान होत असेल तर पुढच्या वीस एक वर्षात त्याचा इतिहास व अस्तित्व नक्कीच कायमचे पुसले जाईल.
आजच्या तरूण पिढीने त्या शस्त्रांचा कसा मान ठेवावा हे खरच ठरवावे..........जय शिवराय

लेखन - अभीजीत धोत्रे
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment