फुलादखानाच्या सक्त पहाऱ्यात महाराज शंभूराजांसह अडकले. महाराज चिंतेत
बुडाले होते. तिथे राजगडी मासाहेबांनाही ही वार्ता समजली. एकीकडे स्वराज्य
आणि दुसरीकडे आपलं काळीज शिवशंभू! त्या माऊलीची व्यथा काय सांगावी!
तुळशीबेलाचा शब्द राखणारा रजपूत रामसिंहही अगतिक झाला होता. सारे वातावरण चिंताक्रांत अन् गंभीर झाले होते. एक एक दिवस विचित्र विचारांनी पोखरून निघत होता.
पण म्हणतात नं ‘नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतीची..’ !!!
सह्याद्रीचा वारा प्यायलेले, झुंजाराची रीत आईच्या गर्भातच उमगलेले ते मराठेच शेवटी! जिथे शक्ती अपुरी पडते तिथे युक्तीची सांगड घालत महाराजांनी अगदी खुबीने आजारपणाचे सोंग घेतले. दिवसेंदिवस गंभीर होणारी राजांची प्रकृती पाहून बादशहा आणि रामसिंह ही चपापला होता.
आजारातुन आराम मिळावा यासाठी काही दानधर्म करावा अशी इच्छा महाराजांनी व्यक्त केली. बादशहाकडून मिळालेल्या होकारानंतर साधुसंत, फकिरांना मिठाई पाठविण्याचे आदेश राजांनी सहकाऱ्यांना दिले. आणि राजांच्या शामियान्यातून मिठाईचे पेटारे निघू लागले. आणि संधीचं सोनं करत अखेर महाराज श्रावण वद्य द्वादशी शके १५८८ , दि १८ ऑगस्ट १६६६ रोजी पेटाऱ्यात बसून राजे पसार झाले.

0 comments:
Post a Comment