Skip to main content

जोडलेली खोट्या नाण्यांची छायाचित्रे पहावी

खोटेपणा कशात नाही हो ? प्रत्येकच गोष्टीत खोटेपणा आहे आणि त्याचा बाजार होउन लोक फसतात. शिवाजी महाराजांच्या नावावर तर हे मोठ्या प्रमाणात होते. शिवाजी महाराजांच्या नावावर लोक भावनिक होउन काहिहि आणि कितीही किमतीला घेतात हे विक्रेत्यांना माहीतीच असते. मी नाणे संग्राहक आहे त्यामुळे मी शिवाजी महाराजांच्या नाण्यांबद्दलच बोलेन. प्रत्येक शिवप्रेमीला, इतिहास वाचकाला, अभ्यासकाला आणि नाणे संग्राहकाला शिवाजी महाराजांचे एक तरी नाणे संग्रही असावे असे वाटत असते आणि ते मिळवण्यासाठी आपण भटकत असतो. आपली त्यामागची भावना अत्यंत शुद्ध असते पण काही ठिकाणी आपला अभ्यास कमी पडतो. शिवरायांची नाणी मुळातच काहि फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत आणि वस्तुच्या उपलब्धतेवरुन वस्तुची किंमत ठरते. उपलब्धता कमी असली की किंमत वाढुन त्याच्या नकला आणि त्याबद्दलचा खोटेपणा ही सुरु होतो आणि तसेच काहीसे ‘शिवराई’ बद्दल झालेले आहे.
‘शिवराई’ बद्दलच्या खोटेपणाचा बाजार हा आज सुरु झाला असे नाही शतकापुर्वीही असा खोटेपणा चालु होता, त्याबद्दल लवकरच मी स्वतंत्र लेख लिहिन.
एखाद्या गोष्टीच्या शोधात भटकुन झाल्यावर जेव्हा ती गोष्ट आपल्या समोर येते तेव्हा त्या गोष्टिचा खरा-खोटेपणा जाणुन घेण्यात आपल्याला काही रस नसतो आपल्याला फक्त ती गोष्ट हवी असते आणि असेच काही लोकांच्या बाबतीत मी ऐकले आहे. बऱ्याच शोधानंतर आम्हाला शिवराई मिळाल्याचे मोठ्या खुशीने त्या लोकांनी सांगीतले पण त्या शिवराई “खोट्या” होत्या. इथे त्यांचे नाण्यांबद्दलचे ज्ञान कमी पडले. आपण आपले ज्ञान स्वतःच वाढवावे कधीही नाणी खरेदी करत असताना एखाद्या नाणकशास्त्र तज्ञाचा सल्ला घ्यावा त्याशिवाय नाणी घेउ नये.
नाणी अभ्यासक हुशार झाले तसे खोट्या नाण्यांचा बाजार चालवणारेही फार हुशार झालेत. अगदी मागील कित्तेक दशकांपासुन संग्रह करणारे तज्ञ लोकही यात फसत आहेत तर त्यापुढे आपण काय ?? शिवराई बद्दलच नाही तर असा खोटेपणा कित्तेक नाण्यांबद्दल आहे त्यामुळे नाणी खरेदी करतांना आपण सावध रहावे आणि खोटी नाणी कशी ओळखावीत ? यावर लिहीणे म्हणजे खोट्या नाण्यांचा बाजार चालवणाऱ्यांना हुशार करणे होइल.
हि खोटि नाणी कोण बनवतं ? कुठे बनवतं ? याबद्दल काही माहीती नाही. पण पुण्याच्या जुन्या बाजारात ही नाणी विकली जात असल्याचे मागे कुनीतरी सांगीतल्याचे आठवते. तसेच काहींना हि नाणी राजकोट, गुजरात भागातुन मिळाल्याचे समजले. ही नाणी अत्यंत हुशारीने बनवली जात आहेत पण आपण सावध राहिलात तर नक्कीच आपण ती ओळखु शकाल. आपल्याला सावध करण्याच्या हेतुने ही पोस्ट लिहीलेली आहे.
या खोट्या नाण्यांची छायाचित्रे सोबत जोडत आहे, ती आपण निरखुन पहावी आणि सावध व्हावे.
हि पोस्ट पुढे share करा जेणे करून आपल्या मित्रांनाही याबद्दल माहिती होईल.

- आशुतोष सुनिल पाटिल.
No automatic alt text available. Image may contain: food

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्कर...

रामदास-शिवाजी संबंध

शिवाजी महाराजांच्या हाती सातारा-चाफळ १६७३ मध्ये पडले. त्यानंतर महाराजांनी चाफळच्या राममंदिराची सर्व व्यवस्था केली आणि परळी (सज्जनगड) हे समर्थ रामदासांचे वास्तव्य ठिकाण ठरवून त्यांच्यासाठी मठ बांधून दिला. शिवाजी महाराजांना समर्थांविषयी पूज्यभाव होता; तथापि महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध किती होता, हे दाखविणारा पुरावा मिळत नाही. शिवराय-समर्थ भेट ही प्रथम राज्याभिषेकाच्या अवघी दोन वर्षे आधी म्हणजे १६७२ मध्ये झाली, असे पत्रव्यवहारावरून दिसते. शिवाजीराजांनी चाफळला दिलेल्या इनामाचे साल लक्षात घेता, हे दोन्ही थोर पुरुष परस्परांना ओळखत असावेत, हे निश्चित आहे. [ ⟶ रामदास].