Skip to main content

Posts

केक कापण्यासाठी तलवारीचे वापर करणे कितपत योग्य....

मागच्या वर्षी नागराज मंजुळेंनी " सैराट " हा मराठी चित्रपट प्रदर्शित केला.. अनेक नविन प्रयोग या चित्रपटात केले गेले. या चित्रपटाने उत्पन्नाचा उच्चांग गाठत चित्रपट सुष्टीत नवा इतिहास रचला..हा चित्रपट खुपच सुंदर....वादच नाही.. परंतू एक पुरातन शस्त्रसंग्राहक या नात्याने मला खटकणारी गोष्ट म्हणजे चित्रपटात पाटीलाच्या मुलाने तलवारीने केक कापणे होय..याचेच अनुकरण करीत प्रविण तरडे य ांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "मुळशी पॅटर्न" यात तलवारीने ( घाणेरड्या) पद्धतीने केक कापून कहरच केला... ज्या राजाने ( महाराजांनी ) स्वराज्य स्थापनेसाठी शस्त्रे कशी असावी व कोणत्या प्रसंगी त्याचा वापर योग्य पद्धतीने कसा करावा याचा अत्यंत सृक्ष्मपणे अभ्यास करून ते रणांगणात उपयोगात आणले असा या 'शिवबांचे' नाव आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात "सर्वात्तम राजा "म्हणून आदराने घेतले जाते... कारण त्याचा असलेला शस्त्र व दुर्ग अभ्यास होय..महाराजांच्या पुढे त्या समयी मोगल, अदिलशाहा, डच, इंग्रज व पोर्तुगीज इ. शत्रू असूनही कठीण प्रसंगी अतिशय संयमाने( नियोजन बध्दतेने) आणखी...

कोराईगड लोणावळा

जोडलेली खोट्या नाण्यांची छायाचित्रे पहावी

खोटेपणा कशात नाही हो ? प्रत्येकच गोष्टीत खोटेपणा आहे आणि त्याचा बाजार होउन लोक फसतात. शिवाजी महाराजांच्या नावावर तर हे मोठ्या प्रमाणात होते. शिवाजी महाराजांच्या नावावर लोक भावनिक होउन काहिहि आणि कितीही किमतीला घेतात हे विक्रेत्यांना माहीतीच असते. मी नाणे संग्राहक आहे त्यामुळे मी शिवाजी महाराजांच्या नाण्यांबद्दलच बोलेन. प्रत्येक शिवप्रेमीला, इतिहास वाचकाला, अभ्यासकाला आणि नाणे संग्राहकाला शिवाजी महाराजांचे एक तरी नाण े संग्रही असावे असे वाटत असते आणि ते मिळवण्यासाठी आपण भटकत असतो. आपली त्यामागची भावना अत्यंत शुद्ध असते पण काही ठिकाणी आपला अभ्यास कमी पडतो. शिवरायांची नाणी मुळातच काहि फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत आणि वस्तुच्या उपलब्धतेवरुन वस्तुची किंमत ठरते. उपलब्धता कमी असली की किंमत वाढुन त्याच्या नकला आणि त्याबद्दलचा खोटेपणा ही सुरु होतो आणि तसेच काहीसे ‘शिवराई’ बद्दल झालेले आहे. ‘शिवराई’ बद्दलच्या खोटेपणाचा बाजार हा आज सुरु झाला असे नाही शतकापुर्वीही असा खोटेपणा चालु होता, त्याबद्दल लवकरच मी स्वतंत्र लेख लिहिन. एखाद्या गोष्टीच्या शोधात भटकुन झाल्यावर जेव्हा ती गो...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांचा मराठा मावळा कसा होता ?

शिवरायांचा मराठा दिसा़यला साधा भोळा, अंगाने रांगडा अन काटक, चेहरा उन्हानं रापलेला, डोक्यावर मुंडासं, गुडघ्या पावतो पैरण, अंगात मळका सदरा, पाठीला ढाल, कमरेला तलवार, पाय आनवाणी, ओठावर तुर्रेबाज मिशा, हनुवटीवर दाढीचे खुट, तोंडात गावरान पण अदबशीर भाषा, चालण्यात मर्दानी ढब, होसला मात्र सह्याद्रीवाणी बुलंद. हातातील तलवार व पाठीवरील ढाली शिवाय त्यांच्याकडे सैनिक असल्याचा कोणताच पुरावा नसायचा, गनिमाने रणभुमीवर ह्यांना लांबून पाहिलं तर त्याला वाटायचं हे यडं गबाळं रूप नुकतच शेत भांगलून आलय हे काय आपला सामना करणार ? पण हाच मर्द गडी जेव्हा समशेर उपसून रणसंग्रामात झेप घ्यायचा तेव्हा त्याच्या अंगात साक्षात रणमार्तंड संचारायचा, अंगात चित्त्याची चपळाई, नजरेत गरूडाची दाहकता व मनगटात शंभर हत्तींचे बळ घेऊन शत्रूवर चवताळून तुटून पडणारा मर्द मावळ्याचा रौद्र आवतार पाहून शत्रू क्षणार्धात गर्भगळीत झालेला असायचा. साधीसुधी दिसणारी मराठा पोरं इतकं भयाण रूप धारण करू शकतात हे शत्रूच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर असायचे, ह्या धक्क्यातून सावरायच्या आतच मराठ्यांच्या पोरांनी गनिमांची अर्ध्याहुनही अधिक फळी उ...

दांडपट्टा.

हे एक मराठ्यांच सर्वात आवडीच हत्यार,याची भेदकता तलवारीहुन जहाल,उभ्या भारतात या शस्त्रावर मराठ्यांइतके नियंत्रण कोणाचेच नाही,मुघल राजपुत लोकांमध्येही हे हत्यार असायचे,पण मराठे यात जास्त कुशल अन तरबेज होते,पट्टा फ़िरवणे मोठे कौशल्याचे काम आहे ,खुप कसब आणि अभ्यास असलेला माणुस पटटा व्यवस्थित फ़िरवु शकतो,पुर्वीचे मावळे १६ हात लांब पट्टाही वापरत,याला बेल्ट प्रमाणे कंबरेभोवती गुंडाळले जाई,सय्यद बंडा ला जिवा महालाने १६ हात लांबुन कलम केले होते. छोट्याश्या लिंबाचे दो न तुकडे पट्ट्याने होतात. आपण मराठीत पटाइत हा शब्द वापरतो,म्हणजे तरबेज,मुळात पट्टे चालवण्यात वाकबगार असलेल्या लोकांना पटाईत असे म्हणले जाते,तोच शब्द पुढे आपल्या बोली भाषेत रुढ झाला,मराठी हशमांमध्ये एक म्हण होती  # धारकरी  म्हणजे जे व्यक्ती तलवार , भाला तीर कमान अथवा अजुन काही अशा ४-५ हत्यारांमध्ये तरबेज असली की त्यांना "धारकरी" गणले जायचे.),अन अजुन एक म्हण होती की "दहा धारकरी तर एक पट्टेकरी " यावरुनच पटाईताला काय मान असेल हे लक्षात येते पट्ट्याची लांबी ५ फ़ुट असते,त्याचे पाते ४ फ़ुट असुन त्याची मुठ म्हणजे खोबळा साधा...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...