शिवचरित्रमाला भाग ११


मस्तकाला गेली. या मराठी कोल्ह्यांनी
आपल्याला निष्ठेची हूल दाखवून
आपल्यावर उघडउघड हल्ले केले याचा अर्थ
काय ? आपण तहानं गाफील झालो.
सिवानं लोणी पळविलं. गाफील का जो
माल है , वो अकलमंदका खुराक है!
पण औरंगजेब यावेळी स्वत: काहीही
करणार नाही याची अचूक खात्री
राजांनी ठेवूनच त्याला निष्ठेच्या तहाचे
आमिष दाखविले अन् डाव साधला.
औरंगजेबाला घाई होती दिल्लीकडे
जाण्याची। कारण बाप अतिशय गंभीर
आजारी होता. केव्हा ना केव्हा
महाराष्ट्रातून ही मोगलाई सत्ता
आपल्याला उखडून काढायचीच आहे.
नक्कीच. आत्ता हीच संधी आहे , हे ओळखून
ही संधी अचूकपणे राजांनी टिपली. पण
पुढची धूर्त नाटकबाजी पाहा. राजांनी हे
छापे घालीत असतानाच रघुनाथ बल्लाळ
कोरडे या आपल्या बिलंदर वकिलाला
औरंगजेबाकडे नजराण्याची चार ताटे देऊन
रवानाही केले होते. कशाकरता ? जुन्नर ,
नगर , श्रीगोंदे इत्यादी मोगली ठाण्यांवर
आमच्याकडून ‘ चुकून ‘ झालेल्या
दांडगाईबद्दल पश्चाताप आणि क्षमेची
याचना व्यक्त करण्याकरिता! या
वकिलाने चिडलेल्या औरंगजेबाची भेट घेऊन
भरपूर पश्चाताप व्यक्त केला. केलेल्या
गोष्टीची खोटी माफी मागितली. हेतू
असा की , दिल्लीची घाई लागलेल्या
औरंगजेबानं जाताजातादेखील
शिवाजीराजांवर लहानमोठासुद्धा घाव
घालू नये.
ही सारी कोल्हेबाजी औरंगजेबाला समजत
नव्हती काय ? होती। पण तो अगतिक
होता. शत्रूच्या अगतिकतेचा असाच
फायदा घ्यायचा असतो , हे कृष्णानं
शिकविलं. शिवाजीराजांनी सतराव्या
शतकात ओळखलं. ज्या दिवशी आम्ही
भारतीय कृष्णनीती विसरलो , त्या
दिवसापासून आमची घसरगुंडी चालू
झाली.
शिवाजीराजांच्या दिशेने संतापाने
पाहात अन् फक्त हात चोळीत
औरंगजेबाला दिल्लीकडे जाणे भागच होते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
Image may contain: 1 person, riding on a horse and horse
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment