Skip to main content

शिवचरित्रमाला भाग २३

*शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.*
९ मे १६६० रोजी शाहिस्तेखान पुण्यात
आला। महाराज याच काळात म्हणजे ( दि. ५ मार्च ते
१२ जुलै १६६० ) पन्हाळगडच्या वेढ्यात अडकले
होते. वेढा जबरदस्त होता. वेढा घालणाऱ्या
सिद्दी जौहरची
सेनापती व योद्धा या नात्यांनी
योग्यता निविर्वाद फार मोठी
होती. सिद्दी जौहर आणि
शाहिस्तेखान या दोन्हीही बड्या
सेनापतीत फरक मात्र फार मोठा होता.
शाहिस्तेखान हा अभ्यासशून्य होता. जौहर हा प्रत्येक
गोष्टीचा खोलवर विचार करणारा होता.
विशेषत: मराठ्यांच्या गनिमी
युद्धतंत्राची त्याला खूप मोठी
जाण होती. म्हणूनच तो अतिशय सावधपणे
पन्हाळ्याच्या वेढ्यात उतरला होता. त्याच्या दैनंदिन
युद्धनेतृत्त्वात ठिसाळपणा , योजनेत
विस्कळीतपणा , शाही सैन्यांत
नेहमीच आढळून येणारा ऐषाराम ,
रणक्षेत्राविषयी अनभिज्ञता , अनुशासनाचा
अभाव असा कोणताही प्रकार कटाक्षाने तो
होऊ देत नव्हता. त्याची शिस्त उत्तम
होती. या सर्वच बाबतीत
त्याची प्रत्येक व्यवहारावर
करडी नजर होती.
त्याच्याबरोबर अफझलपुत्र फाझल महम्मद हा
बरोबरीच्या नात्याने या लष्करात होता। पण
संपूर्ण लष्करी कारभार तो स्वत: दक्षतेने
पाहात होता. त्याच्या हाताखाली
काशी तिमाजी देशपांडे हा
कारभारी होता. नेमकी
शाहिस्तेखानची युद्धनेता या नात्याने
अगदी उलटी प्रतिमा
होती.
एकाचवेळी पुण्यात शाहिस्तेखान आणि
पन्हाळ्याखाली सिद्दी जौहर हे
अफाट सैन्यानिशी स्वराज्याबरोबर झुंजायला
उतरले होते। येथे एक चित्र स्पष्ट दिसते.
शाहिस्तेखानच्या समोर राजगडावरून नेतृत्त्व
करीत होत्या जिजाबाई. त्यांनी
शाहिस्तेखान स्वराज्यावर आल्यापासून ते
शिवाजीमहाराज सिद्दी जौहरच्या
वेढ्यातून निसटेपर्यंत , म्हणजे सुमारे सहा महिने
राजगडावरून शाहिस्तेखानाच्या आघाडीवर
अगदी समर्थपणे तोंड दिले आहे. या खानाने
सुपे , शिरवळ , पुरंदर , सासवड , गराडखिंड या भागात
प्रारंभी (मार्च ते मे १६६० ) हा
स्वराज्यातील उत्तर
आघाडीवरचा भाग जिंकून घेण्याकरता सुमारे
तीस हजार सैन्यानिशी
तीन महिने खूप मोठा गहजब करून पाहिला.
त्याला अजिबात यश आले नाही. याचे श्रेय
नेतृत्त्वाच्या दृष्टीने जिजाऊसाहेबांनाच द्यावे
लागले. हे श्रेय त्या काळात याच भागात मोगलांविरुद्ध
छापे घालीत असलेल्या नेताजी
पालकरांस नाही का ? आहे ना!
नक्कीच आहे.
नेताजीने आपली
कामगिरी खरंच चांगली
केली। पण तो या काळात सतत धावत्या
लढाया (छापेबाजी) करतो आहे. त्यात तो
खेड-मंचरजवळ स्वत:
जखमीही झाला.
तरीही तो झुंजतो आहे. पण
सुपे , शिरवळ , पुरंदर , सासवड इत्यादी
स्थिर ठाणी थोड्याशा बळानिशी
शत्रूच्या अफाट बळाला यशस्वी तोंड देत या
काळात मावळ्यांनी जी अतिशय
अवघड कामगिरी केली आहे ,
त्यामागे नेतृत्त्व आहे. राजगडावर असलेल्या
जिजाऊसाहेबांचे. याच काळातील मावळच्या
मराठी देशमुखांना लिहिलेले एक पत्र
उपलब्ध आहे.
ते पत्र शिवाजीराजांच्या नावाने गेले असले ,
तरी ते नक्कीच राजगडावरून ,
म्हणजेच जिजाऊसाहेबांच्या आज्ञेने गेलेले आहे।
त्या पत्रात म्हटले आहे की ,
‘( आपल्या) मुलखांत मोगलांची
धावणी सुरू जाहली आहे.
तरी तुम्ही
शिकस्तीने रयतेस सांभाळावे.
‘ मोगलांचे बळ फारच मोठे होते। त्यामुळे लुटालुट ,
जाळपोळ , वेठबिगारी , अत्याचार , मंदिरांना
उपदव इत्यादी प्रकार सतत चालू होते. या
सर्व मोगली आघातांचा उल्लेख पुढे
शिवाजीमहाराजांनी सुरतेच्या
सुभेदाराला लिहिलेल्या पत्रात केलेला आहे.
एकूणच स्वराज्य किती भयंकर
कठीण अवस्थेतून जात होते
याची कल्पना येते। या काळात
स्वराज्याशी विश्वासघात करून शत्रूला
जाऊन कोणी मावळे सरदार फितुर
झाल्याची उदाहरणे आहेत का ? होय!
फक्त उदाहरणे आहेत. पहिले आहे
बाबाजीराम होनप देशपांडे याचे , आणि दुसरे
संभाजी कावजी याचे.
चरकात सापडलेल्या उसाच्या कांड्याप्रमाणे सारे
मराठी संसार पिळवटून निघत होते। त्यांत
एखाददुसरे उदाहरण असे निघाले तर दु:खद असले
तरी स्वाभाविक आहे. बाकीचे
सारे स्वराज्य सह्यादीच्या शिळांसारखे घाव
सोसीत अभेद्य राहिले. म्हणूनच अखेरचे
चित्र असेच दिसले की ,
शाहिस्तेखानचाही पण पराभव आणि
सिद्दी जौहरचाही पराभवच.
कारण शत्रूशी झुंजणाऱ्या कडव्या शिवा
काशीदांची , बाजी
घोलपांची , बाजी
प्रभूंची , वाघोजी
तुप्यांची आणि फिरंगोजी
नरसाळ्यांची प्रचंड स्वराज्यसेना
महाराजांच्या आणि जिजाऊसाहेबांच्या
आज्ञेची वाट बघतच तत्पर
होती. जौहर आणि शाहिस्ता यांच्या
दुहेरी आक्रमणात दिसून
आली. मराठ्यांच्या सेनेची
आणि संसारांचीही जिद्द ,
महत्त्वाकांक्षा , निष्ठा , शिवपेम आणि
घोरपडीसारखा चिवटपणा , तीनशे
वर्ष सतत आधीच्या लाचार
गुलामगिरीनंतर हे सर्व
राष्ट्रीय चारित्र्याचे सद्गुण राजापुरच्या
गंगेसारखे उफाळून आले.
ही शिवगंगा बुद्धीमान ,
प्रतिभावात , कल्पक आणि
तरीही अहंकाररहित आणि
उपभोगशून्य युवा शिवाजीराजाच्या मस्तकातून
खळाळत होती. म्हणूनच
मराठ्यांची पोरं पाळण्यात असल्यापासूनच
पराक्रम गाजविण्यासाठी हसतहसत
मुठी वळत होती.
आपण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश जनतेने
आणि त्यांच्या पंतप्रधान चचिर्लने अनेक आघाड्यांवर
जर्मनी अन् जपानसारख्या शत्रूंचा फन्ना
उडविला. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो. ते
कौतुक योग्यही आहे. पण अशाच प्रचंड
आक्रमणातून हिंदवी स्वराज्य
प्रतिपंच्चंदलेखे सांभाळीत व फुलवित आणि
वाढवित नेणाऱ्या आमच्या मावळ्यांना आम्ही
विसरता कामा नये.

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

रामदास-शिवाजी संबंध

शिवाजी महाराजांच्या हाती सातारा-चाफळ १६७३ मध्ये पडले. त्यानंतर महाराजांनी चाफळच्या राममंदिराची सर्व व्यवस्था केली आणि परळी (सज्जनगड) हे समर्थ रामदासांचे वास्तव्य ठिकाण ठरवून त्यांच्यासाठी मठ बांधून दिला. शिवाजी महाराजांना समर्थांविषयी पूज्यभाव होता; तथापि महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध किती होता, हे दाखविणारा पुरावा मिळत नाही. शिवराय-समर्थ भेट ही प्रथम राज्याभिषेकाच्या अवघी दोन वर्षे आधी म्हणजे १६७२ मध्ये झाली, असे पत्रव्यवहारावरून दिसते. शिवाजीराजांनी चाफळला दिलेल्या इनामाचे साल लक्षात घेता, हे दोन्ही थोर पुरुष परस्परांना ओळखत असावेत, हे निश्चित आहे. [ ⟶ रामदास].