Skip to main content

शिवचरित्रमाला भाग ६

तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला!
शहाजीराजे पकडले गेले होते। त्यांच्या
हातापायात बेड्या होत्या. त्यांना मदुराईहून विजापूरला
आणलं अफझलखानानं शहाजीराजांना मकई
दरवाजाने विजापूर शहरांत आणलं. अन् भर रस्त्याने
त्यांना हत्तीवरून मिरवित नेलं. त्यांच्या
हातापायात बेड्या होत्याच. या अशा अपमानकारक
स्थितीतच अफझलखान
शहाजीराजांची या भर
वरातीत कुचेष्टा करीत होता. तो
मोठ्याने शहाजीराजांना उद्देशून म्हणत
होता.
‘ ये जिंदाने इभ्रत है!
‘ खान हसत होता। केवढा अपमान हा! राजांना ते सहन
होत नव्हतं. पण उपाय नव्हता. राजे स्वत:च बेसावध
राहिले अन् असे कैदेत पडले. जिंदाने इभ्रत! म्हणजे
मोठ्या मानाचा कैदी. शिवाजीराजे
स्वराज्य मिळविण्याचा उद्योग करीत होते.
त्यांनी बंड मोडले होते. म्हणून त्यांचे
वडील हे मोठ्या मानाचे कैदी!
आता शिक्षाही तशीच वाट्याला
येणार. हे उघड होतं. सत् मंजिल या एका प्रचंड
इमारतीत राजांना कडक बंदोबस्तात मोहम्मद
आदिलशहाने डांबलं. आता भविष्य भेसूर होतं. मृत्यू!
आणि उमलत्या कोवळ्या स्वराज्याचाही
नाश! जिजाऊसाहेब यावेळी राजगडावर
होत्या। शहाजीराजांच्या कैदेची
बातमी त्यांना समजली ,
त्याक्षणी त्यांच्या मनात केवढा
हलकल्लोळ उडाला असेल! गुन्हा
नसतानाही अनेक कर्तबगार
मराठ्यांची मुंडकी
शाही सत्तांनी
उडविलेली त्यांना माहीत
होती. प्रत्यक्ष त्यांचे वडील
आणि सख्खे भाऊ एका शाही
सत्ताधीशाने असेच ठार मारले होते. आता
शहाजीराजांना जिवंत सोडवायचं असेल , तर
एकच मार्ग होता.
आदिलशाहपुढे पदर पसरून राजांच्या
प्राणांची भीक मागणं!
स्वराजाच्या शपथा विसरून जाणं अन् मिळविलेलं स्वराज्य
पुन्हा आदिलशाहच्या कब्जात देऊन टाकणं।
नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू.
स्वराज्याचा नाश आणि
शिवाजीराजांच्याही अशाच
चिंधड्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं
हे आऊसाहेबांच्या नशीबी
नव्हतं.! शिवाजीराजांनी
स्वराज्यावर याचवेळी चालून आलेल्या
फत्तेखानाचा प्रचंड पराभव केला होता. सुभानमंगळ ,
पुरंदर गड , बेलसर आणि सासवड या
ठिकाणी राजांनी
आपली गनिमी
काव्याची कुशल करामत वापरून
शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या.
सह्यादीच्या आणि
शिवाजीराजांच्या मनगटातील बळ
उफाळून आलं होतं. (दि. ८ ऑगस्ट १६४८ )
अन् त्यामुळेच आता कैदेतले शहाजीराजे
जास्तच धोक्यात अडकले होते।
कोणत्याही क्षणी संतापाच्या
भरात शहाजीराजांचा शिरच्छेद होऊ शकत
होता , नाही का ?
पण शिवाजीराजांनी एका बाजूने
येणाऱ्या आदिलशाही फौजेशी
झुंज मांडण्याची तयारी
चालविली होती , अन्
त्याचवेळी शहाजीराजांच्या
सुटकेकरताही त्यांनी
बुद्धीबळाचा डाव मांडला होता।
राजांनी आपला एक वकील
दिल्लीच्या रोखाने रवानाही केला.
कशाकरता ? मुघल बादशाहशी संगनमत
करून मोघली फौज दिल्लीहून
विजापुरावर चालून यावी , असा आदिलशाहला
शह टाकण्याकरता.
राजांचा डाव अचूक ठरला। दिल्लीच्या
शहाजहाननं विजापुरावरती असं प्रचंड
दडपण आणलं की ,
शहाजीराजांना सोडा नाहीतर
मुघली फौजा विजापुरावर चाल करून
येतील! वास्तविक दिल्लीचे
मोगल हे काही शिवाजीराजांचे
मित्र नव्हते. पण राजकारणात कधीच
कुणी कुणाचा कायमचा मित्रही
नसतो आणि शत्रूही नसतो. उद्दिष्ट कायम
असतं.
हे शिवाजीराजांचं वयाच्या अठराव्या
वषीर्चं कृष्णकारस्थान होतं। अचूक
ठरलं। विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल!
शहाजीराजांना कैद करून
शिवाजीराजांना शरण आणण्याचा बादशाहचा
डाव अक्षरश: उधळला गेला. नव्हे , त्याच्याच
अंगाशी आला. कारण समोर जबडा पसरलेला
दिल्लीचा शह त्याला दिसू लागला. त्यातच
भर पडली फत्तेखानाच्या
पराभवाची. चिमूटभर मावळी
फौजेनं आपल्या फौजेची
उडविलेली दाणादाण भयंकरच
होती.
मुकाट्यानं शहाजीराजांची
कैदेतून सुटका करण्याशिवाय आदिलशहापुढे मार्गच
नव्हता. डोकं पिंजूनही दुसरा मार्ग
बादशहाला सापडेना. त्याने दि. १६ मे १६४९ या
दिवशी
शहाजीराजांची सन्मानपूर्वक
मुक्तता केली. अवघ्या सतरा-अठरा
वर्षाच्या शिवाजीराजांची
लष्करी प्रतिभा प्रकट झाली.
मनगटातलं पोलादी सार्मथ्यही
प्रत्ययास आलं. वडीलही
सुटले. स्वराज्यही बचावलं.
दोन्हीही
तीर्थरुपचं. किशोरवयाच्या पोरानं विजापूर
हतबल केलं. अन् ही सारी
करामत पाहून इतिहासही चपापला.
इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षा
क्षितीजावर विस्मयाने झुकलेल्या दिसल्या.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...