रझिया सुलतान (१२३६- १२४०) दिल्लीचा सुलतान शमसुद्दीन इल्टमश याच्या मृत्यूनंतर त्याचा वडील मुलगा रुकनुद्दीन फिरोजशहा १२३६ मध्ये गादीवर आला.तो अत्यंत दुरवर्तनी, विलासी होता.त्याच्या ऐवजी त्याची दृष्ट आई राज्यकारभार करत होती.त्यामुळे वैतागलेल्या दरबारातील लोकांनी त्या मायलेकांना कैदेत टाकून लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने इलत्मशची मुलगी रझिया हिच्या हाती राज्यकारभार दिला.पुढे त्या मायलेकांचा कैदेत असतानाच मृत्यू झाला. दिल्लीच्या तख्तावर बसलेली रझिया एकमेव स्त्री सुलतान होती.राझियाचा जन्म १२०५ साली झाला.तिच्याकडे राज्यकारभार कौशल्य,हुशारी,नेतृत्व, आणि मुसद्दीपणा हे गुण होते.ती मर्दानी पोशाख करून हत्तीवर स्वार होऊन प्रत्यक्ष युद्धात सैन्याचे नेतृत्व करी.तिला कारभार हाती घेतल्यावर अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. बदाऊन,सुलतान,हान्सी आणि लाहोरच्या सुभेदारांनी, तसेच वजीर निजाम-उल-मुल्कने राझियाला राजपदावरून हटविण्याचे प्रयत्न सुरु केले.तिने यावर लगेच कार्यवाही सुरु करून पण लष्करातील कमकुवतपणा लक्षात घेऊन युद्धप्रसंग टाळला.तिने मलिक सलारी व कबीरखान यांच्याशी गुप्तपणे संधान बांधले.त्यांना राझि...