फ्रान्सचा_यशवंतराव yashvantrao of frans


No automatic alt text available.
#काही इतिहासकारांनी यशवंतराव होळकरांना भारताचा नेपोलियन अशी पदवी दिली आहे. कारण इतिहासकारांच्या मते दोघांच्या युद्ध रणनीतीमध्ये असलेले साम्य. पण वास्तव याहून वेगळे आहे. खरे तर यशवंतरावांनी नेपोलियनच्या आधी लढाया केल्या. त्यांच्यानंतर नेपोलियनने. यशवंतराव आणि इंग्रज यांच्यात झालेली युद्धे, त्यामध्ये यशवंतरावांची सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची वृत्ती, संभाव्य पराजयाचाही केलेला विजय, बेमालूमपणे इंग्रजांची केलेली कत्तल, गोऱ्यांना पळता भूई थोडी करून त्यांची कापलेली नाके, भरतपूरच्या युद्धात केलेला इंग्रजांचा दारुण पराभव इत्यादी राजकीय व सामरिक घटनांची नोंद भारतातील तत्कालीन फ्रेंच आपल्या मायदेशी कळवत होते. इंग्रज यशवंतरावांना पूर्णपणे कधीही पराभूत करु शकले नाहीत. याची जागतिक इतिहासकारांनी नोंद केलेली आहे. यावरून नेपोलियन या घटनांमधून काहीच शीकला नाही असे म्हणता येणार नाही. या उलट इंग्रजांनी नेपोलियनचा कितीतरी वेळा पराभव केला आहे. यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची इंग्रज सरकारला हकालपट्टी करावी लागली होती. याची इतिहासात नोंद आहे. फ्रेंच इतिहासकारांच्या मते १८०४ साली यशवंतराव आणि इंग्रज यांच्यात झालेले भरतपूरचे युद्ध हे नेपोलियन आणि इंग्रज यांच्यात १८१५ साली झालेल्या वार्टूल युद्धापेक्षा अवघड होते. भरतपूर युद्धात यशवंतरावांनी इंग्रजांची दाणादाण उडवली होती. तर वार्टूल येथील निर्णायक युद्धात नेपोलियनच्या सैन्याचा इंग्रजांनी पूर्णपणे पाडाव करुन त्याला कैद केले होते. यावरून यशवंतरावांना भारताचा नेपोलियन न म्हणता उलट नेपोलियनला फ्रान्सचा यशवंतराव म्हणणे अधिक योग्य होईल. इतिहास अभ्यासावरून #धुळदेव कोळेकर #होळकरशाही
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment