राजियांनी अफझल मारिला, कर्म केले, यश आले. Chhatrapati Shivaji Maharaj and Afzal Khan


Chhatrapati Shivaji Maharaj and Afzal Khan
.स.१६४९-१६५६ ही सात वर्षे,या सात वर्षात एकिकडे शिवराय प्रजेची चोख व्यवस्था लावीत होते व दुसरीकडे आपले युद्धसामर्थ्य क्रमाने वाढवत होते. त्यानंतर उठाव करण्याचा प्रयत्न म्हणजे अफजलखानाच्या स्वारीला आमंत्रण,याची छत्रपतींना पुर्ण कल्पना होती.
कारण अफजलखान हा वाईचा सुभेदार होता.त्याच्या सुभ्यावर हल्ला झाल्याने त्याची जबाबदारी त्याच्यावरच येऊन पडणार होती. स्वत: अफजलखान हा कर्नाटकाच्या लढाईत गुंतलेला होता. त्यामुळे तो वेगाने जावळीकडे लक्ष देऊ शकत नव्हता. त्यांना शिवरायांकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. यानंतर उसंत सापडल्याबरोबर प्रचंड शक्तिनिशी अफजलखान हल्ला करणार,हि गोष्ट ठरल्यासारखी होती.
भारतीय राजांमध्ये शिवराय हे असे विरळ राजे आहेत की, ज्यांनी सदैव संभाव्य परिणामांचा विचार केला.युद्धाची योजना आखताना भूगोलाचा विचार केला.त्यामुळे आदिलशाही मोगलांच्या स्वारीत व्यस्त असताना छत्रपतींनी खानाच्या आगमनाची तयारी जोरात केली,शिवरायांनी जावळीच्या खोर्यात आपली व्यवस्था रुजवली . शत्रुपक्षाकडील प्रत्येक गुप्त बातमी आपल्याला मिळेल याची काळजी घेतली.
शिवरायांचे गुप्तहेर खाते व युद्धाचे भौगोलिक नियोजन हा त्यांच्या युद्धनेतृत्वाचा महत्वाचा भाग आहे. अफजलखानाच्या स्वारीला त्याचाच सुभा जावळी हे उत्तर होते. आक्रमणाला अत्यंत प्रतिकुल रणभुमी हेत तर जावळीचे वैशिष्ट्य. जिथे नियोजन चालू होते, १२००० फौजांच्यासकट खान नष्ट करण्याचे , त्या नियोजनात खान जिवंत वाचु नये हे गृहीत होते. अफजलखान या प्रश्नाला शिवरायांनी जावळी हे उत्तर कल्पनेत रचले होते. ते त्यांनी व्यवहारात साकार केले. महिनोगणती तपशीलवार रचना करुन ठरविक ठिकाणी, ठराविक दिवशी शत्रुला आणण्याची व त्याच्या संपूर्ण नाशाची योजना आखायची, ती त्याला परत जाऊ देण्यासाठी नसते.
महाराजांनी ज्यावेळी जावळी घेतली त्याचवेळेस खान आपल्यावर चालुन येणार हे महाराजांनी माहित होते कारण खान हा वाईचा सुभेदार होता व ज्या सुभ्यात बंड होईल त्या बंडाची पारिपत्याची जबाबदारी त्या सुभेदारावर असते. खान हा कसलेला योद्धा होता.तो कुशल सेनानी होता,तसा कपटी होता आणि विशेष म्हणजे रणमैदान त्याच्या ओळखीचे होते कारण तो त्याच्याच सुभ्याचा भाग होता.त्यामुळे खान मुर्ख,गर्विष्ठ,बेसावध , प्रदेशाला अपरिचित सरदार होता हे म्हणणे चुकीचे राहिल.
"शिवरायांच्या चरित्रकाराला त्यांच्या शत्रुंची मग तो खान असो शाहिस्तेखान असो किंवा औरंगजेब असो ह्यांना पुर्णपणे मांडण्यास असमर्थ ठरल्यास शिवरायांचा पराक्रम निम्म्याहुन अधिक ढासळतो",
कारणे हे शत्रु काही साधे-सुधे नव्हते.अफजलखानाने मुघल सम्राट औरंगजेबाला वेढ्यात अडकवले होते ,महाराजसाहेब शहाजी महाराजांना कपटाने कैद करण्यात खानाचा पुढाकार होता एवढा तो पराक्रमी होता.एक कुशल यौद्धा ,राजा म्हणुन शिवरायांचे महत्व ह्यात आहे की त्यांनी अफजलखानाची स्वारी यशस्वी होऊ दिली नाही.या ठिकाणी शिवरायांचे चौरस नियोजन व विजयाला राज्यविस्तारात रुपांतर करण्याचे कौशल्य दिसुन येते.
अफजलखानाचा वधाचा उत्सव करत शिवराय बसले नाहीत त्यानी तातडीने पन्हाळा कोल्हापूर घेतला, घोडदळ ३००० वरुन ७००० वर गेले.
. अफजलखान वधाचा प्रसंग आला म्हणजे चर्चा सुरु होते आधी कुणी दगा दिला. हा पुर्णपणे निरर्थक चर्चा आहे.प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलेला खान जिवंत परत जाणे शक्य नव्हते,हे आपण समजुन घेतले पाहिजे.याचा खान कसा वागला ह्याच्याशी संबंध नसुन पुढच्या ध्येयवादाशी आणि मागच्या इतिहासाशी आहे.
ठरल्याप्रमाणे १० नोव्हेंबर १६५९ रोजी खान मारला गेला,जावळीच्या खोर्यातील त्याच्या प्रचंड फौजांचा पराभव झाला.इथुन एका वैभवशाली बदलास सुरुवात होते. हा अखिल भारतीय कर्तृत्वाचा पहिला बहर होता. त्याचे कडु-गोड परिणाम सर्वांनाच चाखणे भाग होते.खानवधानंतर आलेल्या शाहिस्तेखान व सिद्दीजौहर या तिप्पट आक्रमणामुळे शिवरायांना आता अखिल भारतीय स्तरावर महत्व वाढले आणि चटकन लक्षात येते..
-नरहर करुंदकर

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment