....कित्येकांसाठी परीक्षेत पास होण्याचा विषय अन
काहींसाठी आयुष्य.....शाळेच्या पुस्तकातून परीक्षेपुरते पाठ केलेले उतारे
आयुष्यभर लक्षात राहतील अस कुणाला वाटल होत .पणचवथीच्या पुस्तकातला तो
शिवरायांचा फोटो अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही .“ गड आला पण सिंह गेला “
हे वाक्य काळजावर कोरल गेलय .खिंड आपल्या रक्ताने पावन करून माझ्या राजाला
अभिषेक वाहणारा वीर बाजींचा देह अजूनही लढताना दिसतो. अशी एक ना अनेक नाव कळायला लागल्यापासून ऐकली , समजली आणि जगली.बालवाडीत असताना बोबड्या बोलात
कित्येकदा “ शिवाजी लाजा कि जय “ अस नकळत बोलून गेलो असेन.का? काही समजत
नसताना , उमजत नसताना अस का व्हाव ?लहानपणी आईने जस शुभम करोति म्हणायला
शिकवलं तसे शिवाजी महाराज हि शिकवले.
माझ्या राजाला जिजाऊनी भले राम – कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या असतील पण
मी मोठा होताना आईने मला शिवबाच्या गोष्टी सांगितल्या. आईने जशी
भवानीमातेची पूजा केली तशी ती जिजाऊंची महती सांगायला विसरली नाही.
अभिमन्यूने चक्रव्युहात प्राण दिला पण त्याच वेळी माझ्या शंभू राजांचा
पराक्रम सांगायला ती विसरली नाही.इतिहासाचा अभ्यास पाठ्यपुस्तकातून फार
उशिरा सुरु झाला कारण त्याची ओळख आईने कधीच करून द्यायला सुरुवात केली
होती.याच कारण काय? याच कारण एकच“ मराठ्यांच्या घरात इतिहास सांगितला जात
नाही तो जगला जातो , अनुभवला जातो .
मराठ्यांच्या घरात जिजाउन्चे संस्कार बोलले जात नाहीत ते घडवले जातात. इथ इतिहास रोज नव्या रुपात जन्माला येतो हा वारसा पुढ नेण्यासाठी. इथ मराठे जन्माला येतात आणि मरण पावतात , इतिहास अमर राहतो.काहींसाठी हेच आयुष्य असत
मराठ्यांच्या घरात जिजाउन्चे संस्कार बोलले जात नाहीत ते घडवले जातात. इथ इतिहास रोज नव्या रुपात जन्माला येतो हा वारसा पुढ नेण्यासाठी. इथ मराठे जन्माला येतात आणि मरण पावतात , इतिहास अमर राहतो.काहींसाठी हेच आयुष्य असत
Comments
Post a Comment