शिवचरित्रमाला भाग १७

अजिबात
प्रतिहल्ले केले नाहीत. उलट ठाणी
गेल्यावर महाराजांनी सरसेनापती नेताजी
पालकरांना त्यांनी सांगितले , ‘ ही गेलेली
ठाणी परत घेण्याचा आत्ता अजिबात
प्रयत्न करू नका.
‘ या काळात महाराजांच्या सैन्यानं
खानाच्याविरुद्ध कुठेही लहानसाही
हल्ला केला नाही. खानाला या काळात
महाराजांनी कधीही पत्र वा
राजकारणी बोलणी करण्यासाठी
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दूत पाठविला
नाही. अगदी गप्प राहिले. झडप
घालण्यापूवीर् चित्ता जसा दबून बसतो ,
डरकाळ्या फोडत नाही , तसे यामुळे खान
बुचकळ्यातच पडला होता. या
शिवाजीच्या मनांत आहे तरी काय याचा
त्याला थांगपत्ताही लागत नव्हता.
पावसाळ्याचे चार महिने उलटल्यावर प्रथम
खानानेच आपला वकील कृष्णाजी भास्कर
कुलकणीर् यांस वाईहून महाबळेश्वराच्या
पर्वताच्या पलिकडे दरीत असलेल्या
प्रतापगडावर पाठविले. महाराजांना
डोंगरातून बाहेर काढण्याचा खानाचा
हा शेवटचा प्रयत्न. त्याने वकीलाबरोबर
पत्रही दिले होते. खानाची अशी
दरडावणी होती अन् वकीलाची गोडगोड
बोलणी होती की , ‘ प्रतापगडाहून
आम्हांस वाईत भेटण्यासाठी हुजुरदाखल
व्हा ,’ म्हणजे आमच्या पंजात या! आमच्या
घशात येऊन पडा.
हेही खानाची गोडगोड अर्जवणी अन्
कठोर दरडावणी महाराजांनी अतिशय
कुशलतेने अन् खानालाच प्रतागडाच्या
खाली येणे भाग पाडले अगदी नम्रतेने.
शरणागतीच्या भाषेत.
या काळात स्वराज्याच्या हेरांनी आपली
कामगिरी अतिशय उत्कृष्ट कौशल्यानी
आणि तत्परतेने केली. याचवेळी
राजापूरच्या बंदरात , कोकणात
आदिलशाहीची तीन लष्करी गलबते येऊन
थांबली होती. जर युद्ध भडकले आणि
कोकणात पसरले तर अफझलखानाला या
गलबतातील युद्धसाहित्याचा उपयोग
व्हावा हा आदिलशाही हेतू होता. गलबते
सुसज्ज होती. पण त्यांवरील शाही माणसे
पूर्ण गाफील होती. इतकेच नव्हे तर
खानाची छावणी , पुणे , सातारा ,
कोल्हापूर आणि सांगली या भागातील
आदिलशाही ठाणी आणि प्रत्यक्ष
खानही वाढत्या प्रमाणात गाफीलच बनत
होता. ही किमया महाराजांच्या
वकीलाची , हेरांची आणि प्रत्यक्ष
महाराजांच्या बोलण्याची.
या साऱ्याचा परिणाम ? पराभव
कुणाचा ?
Image may contain: 3 people
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment