Skip to main content

शिवचरित्रमाला भाग १८

*सश्रद्ध, पण सावधान असावे!*
स्वत: पूर्ण सावध राहून शत्रूला गाफील
बनवायचं आणि त्याच्या गाफीलपणाचा
पुरेपूर फायदा उठवायचा हा
शिवाजीराजांचा डाव। हाच त्यांच्या
बुद्धीबळाचा डाव. आपल्या वकीलाच्या
मार्फत महाराज खानाला आपल्या
चक्रव्यूहात गंुतवित चालले होते. खानाने
प्रतापगडच्या पायथ्याशी यायचं मान्य
केलं.
खरं म्हणजे इथं जावळीच्या जंगलात
गडाच्या वाटेवर खान यायला कबूल
झाला ही खानाची चूकच नाही का ?
नाही। खानाला येणं भागच होतं.
नाहीतरी तो दुसरं काय करू शकत होता ?
त्याला शिवाजीराजा आपल्या
मगरमिठीत हवा होता. त्याकरीता अखेर
त्याला प्रतापगडावर हल्ला करण्याकरता
तरी यावच लागलं असतं. त्याने सरळ विचार
केला की , शिवाजी आपल्या भेटीसाठी
गडावरून खाली यायला तयार होतोय.
म्हणजेच आपण गडापर्यंत युद्ध न करताच ,
विना अडथळा जाऊन पोहोचू शकतोय
तेही आपल्या फौजेसह. म्हणून खानाने ही
फार मोठी अनुकूल गोष्ट घडणार आहे हे
लक्षात घेऊन प्रतापगडाखाली यायचं
ठरविलं.
यात त्याची काहीच चूक नाही। तो
चुकला स्वत:च्याच गाफीलपणामुळे.
राजकारण , दारुगोळ्याचं कोठार आणि
तपोसाधना यांत किंचितही गाफील
राहून चालत नाही. तपोभंग करायला
केव्हा एखादी अप्सरा येईल याचा नेम
नसतो. दारुगोळ्याचं कोठार उडवायला
कुठून ठिणगी येईल याचाही नेम नसतो अन्
राजकारणात एखादा चाणक्य , कृष्ण
किंवा शिवाजीराजा केव्हा
समोरच्याला उलथंपालथं करून टाकील
याचाही नेम नसतो. खान याबाबतीत
अत्यंत बेसावध राहीला. तेही स्वत:च्या
मनात शिवाजीराजाचा विश्वासघाताने
जीव घेण्याची इच्छा धरून.
खान वाईवरून महाबळेश्वराकडे निघाला।
राजांना जिवंत किंवा ठार मारून कब्जात
घ्यायचं अन् विजापुरला न्यायचं हे त्यानं
अगदी निश्चित ठरविलं होतं.
या प्रतापगड कालखंडात महाराजांना
अनेक मानसिक यातनांना तोंड द्यावे
लागले होते। ते प्रतापगडावर राजकारणात
व्यग्र असतानाच तिकडे राजगडावर
त्यांच्या राणीसाहेब सईबाई या मृत्यू
पावल्या. (दि. ५ सप्टेंबर १६५९ ) हे दु:ख
सामान्य होतं का ? त्यांचा पुत्र
संभाजीराजा हा अवघा दोन वर्षाचा
होता. जिजाऊ साहेबांना चिंता
आगीसारखी भाजून काढीत होती.
आईची चिंता ही महाराजांना केवढी
असहनीय होत होती. आईवर कमालीचं प्रेम
करणारा हा पुत्र होता.
एक गोष्ट सर्वात चिंतेची होती , ती
महाराजांच्यावर अपरंपार पेम करणाऱ्या
मावळ्यांच्या मनस्थितीची। हे मावळे
महाराजांवर रामायणातल्या
हनुमंतासारखे अन् वानरदळासारखे प्रेम
करीत होते. त्यांचा महाराजांना
प्रथमपासूनच आग्रह होता की , ‘ महाराज
, खानाला जातीने भेटू नका , धोका आहे.
तो घात करील या डोंगरदऱ्यात खानाशी
आम्ही झुंजतो. वर्षनवर्ष ही झुंजतो. पण
तुम्ही त्या आगीत शिरू नका.
‘ मावळ्यांचे आणि सरदारांचे हे प्रेम
अलौकीक होते। पण महाराजांचा डाव
त्यामुळे अडखळत होता. शत्रूच्या
जास्तीतजास्त फौजेचा आपल्या
कमीतकमी फौजेनिशी , कमीतकमी वेळेत
पूर्ण पराभव करण्याचा डाव महाराजांनी
आखला होता. यावर हे सवंगडी म्हणत होते
, ‘ हे जमलियास ठीक. पण न जमलियास
कैसे होईल ?
‘ महाराजांचा जबरदस्त आत्मविश्वास
आणि मावळ्यांचे जबरदस्त प्रेम यांचा हा
संघर्षच होता।
आणि महाराजांनी एका मध्यरात्री
अर्धवट झोपेतून खडबडून उठून आपल्या या
सरदारांना आपलं स्वप्नच सांगितलं।
महाराजांचे शब्द असे , ” श्री भवानी
आमच्या स्वप्नात आली. श्री आम्हांस
बोलली की , ‘ लेकरा , त्याने (खानाने)
माझा अपमान केला. त्वा काम काळजीने
करावे. तुजला यश लाभेल. मीतर तुझी
तलवारच होऊन राहिली आहे. ‘ श्री
आम्हांस प्रसन्न झाली.
” अन् मग अवघ्यांना पटलेचकी आता यश
मिळणार। महाराजांनी जनतेच्या
श्रद्धेचा केलेला हा अचूक उपयोग. श्रद्धा हे
सार्मथ्य आहे. अंधश्रद्धा हे दौर्बल्य आहे.
महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही
अंधश्रद्धा ठेवली नाही. पण योग्य
श्रद्धेचा आत्मबळ वाढविण्यासाठी असा
उपयोग केला.
महाराजांनी खरोखरच आपल्या तलवारीचे
नाव ‘ भवानी ‘ असे ठेवले.
खरंच महाराजांना स्वप्नात भवानीदेवी
दिसली की ? ती बोलली का ? श्रीचं
जाणे! पण स्वराज्यावर आलेलं भयंकर संकट
या श्रीवरच्या सश्रद्धेनेच उधळलं गेलं। राज्य
वाचलं , राजा वाचला. ध्वज वाचला हे
मात्र सत्य. ज्याने त्याने आपल्या बुद्धीने
आणि भावनेने निवाडा करावा.
मात्र महाराजांचे आणि सरदारांचे सर्व
काम अत्यंत सावधपणे , शिस्तबद्ध आणि
योजनाबद्ध चालूच होते. खान
महाबळेश्वरपर्यंत येऊन दाखल झाला
होता.

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्कर...

रामदास-शिवाजी संबंध

शिवाजी महाराजांच्या हाती सातारा-चाफळ १६७३ मध्ये पडले. त्यानंतर महाराजांनी चाफळच्या राममंदिराची सर्व व्यवस्था केली आणि परळी (सज्जनगड) हे समर्थ रामदासांचे वास्तव्य ठिकाण ठरवून त्यांच्यासाठी मठ बांधून दिला. शिवाजी महाराजांना समर्थांविषयी पूज्यभाव होता; तथापि महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध किती होता, हे दाखविणारा पुरावा मिळत नाही. शिवराय-समर्थ भेट ही प्रथम राज्याभिषेकाच्या अवघी दोन वर्षे आधी म्हणजे १६७२ मध्ये झाली, असे पत्रव्यवहारावरून दिसते. शिवाजीराजांनी चाफळला दिलेल्या इनामाचे साल लक्षात घेता, हे दोन्ही थोर पुरुष परस्परांना ओळखत असावेत, हे निश्चित आहे. [ ⟶ रामदास].