Skip to main content

शिवचरित्रमाला भाग १६

हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्यावर
प्राणांतिक संकट येत असलेले पाहून
भारतातील कोणकोण राजांच्या
मदतीकरता येणार होते ? राजपूत ? जाट ?
बुंदेले ? गढवाल ? डोग्रा ? शीख ?
कोणीही नाही। जे काही करायचं होतं ते
राजांना आपल्या साध्यासुध्या गरीब
मावळ्यांच्या जिवावरच करायचं होतं.
साधी सहानुभूतीसुद्धा मिळण्याची
वानवा होती. पण राजांचा पूर्ण विश्वास
होता या आपल्या भावांवर आणि
भवानीवर।
दरमजल खान फौजेनिशी पुढे सरकत होता.
महाराजांना धामिर्क भावनेने
चिडविण्याचा आणि सह्यादीतून
मोकळ्या मैदानावर काढण्याचा डाव
पूर्णपणे फसला. वासरू जसं गाईपासून दूर
जात नाही. तसंच महाराजांचं प्रेम
सह्यादीच्या गडकोट दऱ्याखोऱ्यांवर
होतं. ते त्याला बिलगून होते.
याचवेळी दिल्लीत बादशाह बनलेला
औरंगजेब काय विचार करीत होता ? हा
दख्खनचा आखाडा त्याला दिसत होता.
तो शिवाजीराजांवरही भयंकर चिडलेला
होता आणि अफझलखानाशीही म्हणजेच
विजापूरच्या आदिलशाहीशीही त्याचं
शत्रूत्त्वच होतं. त्याने साधा सरळ विचार
केला की , आपले हे दोन्हीही शत्रूच आहेत.
आदिलशाह आणि सीवा. हे दोघेही
आपसांत झुंझणार आहेत. यातील जो
कोणी शिल्लक उरेल त्याच्याविरुद्ध नंतर
आपण पाहू काय करायचं ते! बहुतेक उरणार
अफझलखान. शिवाजी संपणार. हरगीज
संपणार!
गोव्याचे पोर्तुगीजही अलिप्तच राहिले.
जंजिऱ्याच्या सिद्दीची हौस मराठी
राज्य कोकणातून मुरगाळून काढण्याचीच
होती. पण यावेळी महाराजांच्या विरुद्ध
फार मोठी गडबड करण्याची कुवत
त्याच्यात नव्हती. जी गडबड थोडीफार
सिद्दीने केली ती महाराजांच्या मराठी
सरदारांनी उधळून लावली. सिद्दी गप्प
बसला.
आता सरळसरळ डाव होता अफझलखान
विरुद्ध शिवाजीराजे. शिवाजी डोंगरातून
बाहेर पडत नाही हे खानाला दिसून आले
तरी तो प्रयत्न करीत होता. वाईत आल्या
आल्या (इ. स. १६५९ मे) त्याने
स्वराज्याच्या पूर्व कडेवर असलेली चार
ठाणी सात हजार फौज पाठवून एकदम
जिंकली. ठाणी अगदीच लष्करी बाबतीत
लहानशी होती. शिरवळ , सासवड , सुपे
आणि पुणे.
या झडपेचा मराठी रयतेवर नक्कीच दहशती
परिणाम होईल. लोक घाबरतील ,
आपल्याकडे येऊन सामील होतील अशी
त्याची अपेक्षा होती. या दहशतीच्या
जोडीला लोकांना धनदौलतीचे आमिष
दाखविले तर ही खेडवळ मावळी माणसं
नक्कीच आपल्या पायाशी येतील अशी
खानाला खात्री वाटली. त्याने
मावळच्या देशमुख सरदारांना
आदिलशाहीच्या शिक्कामोर्तबीची
फर्माने पाठविली. त्या फर्मानात शाहने
या सरदारांना फर्मावले होते की , ‘
शिवाजीची बाजू सोडा आणि नामजाद
सरदार अफझलखान यांस सामील व्हा. जर
सामील झालांत तर तुमचं कोटकल्याण करू.
पण जर शिवाजीच्याच बाजूला राहून
बादशाहीविरुद्ध वागलांत तर तुमचा साफ
फडशा उडवू. याद राखा! आम्ही
शिवाजाचा मुळासकट फडशा पाडणार
आहोत ‘!
हे असलं भयंकर जरबेचं पण तेवढंच गोड
आमिषाचं फर्मान महाराजांच्या सर्व
मावळी सरदारांना खानानं पाठविले.
पहिलंच फर्मान वाईपासून अवघ्या पाच
कोसावर असलेल्या कान्होजी नाईक जेधे
यांना मिळालं. कान्होजी नाईक ते
फर्मान घेऊनच राजगडावर
शिवाजीमहाराजांकडे आले. आपल्या
पाचही तरुण पुत्रांसह आले आणि त्यांनी
महाराजांना आभाळाएवढ्या विश्वासानं
सांगितले की , ‘ आपण अजिबात चिंता करू
नका. मावळच्या सर्व सरदारांच्यानिशी
मी तुमच्या पायाशी आहे. मी माझ्या
घरादाराव पाणी सोडतो। ‘
केवडा प्रचंड विश्वास हा! आणि
कान्होजींनी मावळच्या सर्व देशमुखांना
सांगाती घेऊन महाराजांकडेच धाव घेतली.
फक्त उतवळीकर खंडोजी देशमुख हा एकमेव
सरदार आधीच अफझलखानाला जाऊन
मिळाला होता. बाकीचे सर्व जिवलग
स्वराज्याच्या झेंड्याखाली!
खानाला वाटलं होतं की , लाचार
भित्र्या भिकाऱ्यासारखे हे मावळे
माझ्या छावणीत सेवा करायला येतील.
त्याची पूर्ण निराशा झाली. तरीही
त्याने एक गंमत केली. या शिवशाही
सरदारांच्या घरात नव्या पिढीतील पोरं
होती. कुणाचा मुलगा , कुणाचा पुतण्या ,
कुणाचा भाऊ इत्यादी या तरुण पोरांच्या
नावानं. खानानं नवी अशीच आमिषाची
फर्मानं पाठविली. पण एकही पोरगा
खानाला जाऊन मिळाला नाही. सारं
स्वराज्यच महाराजांच्या पाठीशी खडं
झालं.
महाराजांनी हे निर्माण केलं. आजच्या
भाषेत त्याला म्हणतात राष्ट्रीय
चारित्र्य. राष्ट्रीय निष्ठा. हे जर
आपल्यापाशी असेल तर आपण शत्रूचे पॅटन
रणगाडे ही उलथून पाडू शकतो.
कान्होजींसारखे परमवीर अब्दुल हमीद
आमच्यात तळपू शकतात. आमच्या
आकांक्षांचे झेंडे गगनात चढू शकतात.

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...