Skip to main content

शिवचरित्रमाला भाग १५

*कठीण नाही ते व्रत कसलं?*
अगदी प्रारंभापासून जिजाऊसाहेब ,
शिवाजीराजे आणि राज्यकारभारी
यांनी एक अत्यंत महत्त्वाची पद्धत
स्वराज्यात सुरू केली। प्रधानमंडळांपासून ते
अगदी साध्या हुज – यापर्यंत प्रत्येक
स्वराज्य- नोकराला रोख पगार , वेतन. हे
वेतनही प्रत्येकाला अगदी नियमितपणे
मिळावे , अशी व्यवस्था कोणालाही
नोकरीच्या मोबदल्यात वतन किंवा
मिरासदारी दिली जात नसे. संपूर्ण
राज्यकारभाराची आथिर्क व्यवस्था
वेतनावरच योजिली होती. सरंजामशाही
आणि वतनशाही याला इथेच प्रतिबंध
घातला गेला.
कोणत्याही बादशाहीत हा असा वेतनबद्ध
राज्यकारभार दिसत नाही। सामान्य
नोकरांना पगार असतील. पण बाकीच्या
मोठ्यांना नेमणुका सरंजाम , जहागिऱ्या
आणि वतनदाऱ्या होत्या. यामुळे अनुशासन
राहतच नव्हते. शिवाजीराजांपाशी
हुकमी शक्ती सतत सुसज्ज होती , यातील
हे एक प्रबळ कारण होते. पगारी
पद्धतीवरती राज्यकारभार करणारा
शिवाजीराजा हा अर्वाचीन युगातला
एकमेव राज्यकर्ता. त्यामुळे
सरंजामशाहीतील दुर्गुण राजांनी
अस्तित्त्वातच येऊ दिले नाहीत.
आत्तापर्यंत बुडालेल्या बादशाह्या आणि
विजयनगरचे राज्य का बुडाले याचा अचूक
वेध शिवाजीराजांनी निश्चित घेतला
होता. यात शंका नाही. त्या चुका
आपल्या स्वराज्यात होता कामा नयेत.
याकरिता ते अखंड सावधान होते.
माणसांची परीक्षा होते ती कठोर
संकटाच्या आणि भरघोस स्वार्थाच्या
वेळी। ती वेळ सामोरी आलीच.
कमालीच्या अस्वस्थ आणि संतप्त
झालेल्या आदिलशाही दरबारने एक प्रचंड
निर्णायक मोहीम राजांच्या विरुद्ध
योजिली. इ. स. १६४७ पासून ते आत्ता इ.
स. १६५९ प्रारभापर्यंत आदिलशाहीला
शिवाजीराजे सतत पराभवाचे फटके देत
होते. स्वराज्याचा मुलूख वाढत होता.
कोकणातील फार मोठा प्रदेश , बंदरे आणि
किल्ले राजांनी काबीज केले होते.
स्वराज्याचं आरमार दर्यावर स्वार झालं
होतं. आरमाराकडे म्हणजेच सागरी
सरहद्दीकडे यापूवीर् वाकाटक राजांपासून
ते यादव राजांपर्यंत अगदी शिलाहार
आणि कदंब राजांपर्यंतही कोणी महत्त्व
ओळखून लक्षच दिले नव्हते. कुणाकुणाचे
थोडीशीच गलबते दर्यावर तरंगत होती. पण
ती लुटुपुटीच्या पोरखेळासारखीच.
पोर्तुगीज आणि अरबांसारख्या
महामहत्त्वाकांक्षी शत्रूला अन्
चाचेगिरी करणाऱ्या कायमच्या शत्रूला
धडक देण्याइतकी ताकद आपल्यात असली
पाहिजे हे शिवाजीराजांनी अचूक
ओळखलं. त्यांनी आरमार उभे करण्यास
गतीने सुरुवात केली.
खरं म्हणजे ही आरमाराची परंपरा
शालिवाहनांपासूनच चालू राहिली
असती , तर पुढे शिवाजीराजांनी आपले
आरमार असे जबर बनवले असते की , खरोखरच
मराठ्यांचे लष्करी आणि व्यापारी जहाजे
थेट इराणी , अरबी , युरोपी आणि
आफ्रिकी किनाऱ्यांपर्यंत जाऊन धडकली
असती। खऱ्या अर्थाने रुमशाम पावेतो
आमचे आथिर्क आणि लष्करी साम्राज्य
निर्माण झाले असते. पण ‘ सागरी
पंचक्रोशी ओलांडली तर आपला धर्म बुडतो
‘ अशी खुळचट कल्पना आमच्या
धर्मपंडितांनी इथे रुजविली अन् वाढविली.
आता शिवाजीराजांना आरमाराच्या
श्रीगणेशापासून सुरुवात करावी लागत
होती. स्वराज्याचे भाग्य असे की ,
कोकणातील साऱ्या दर्यावदीर्
जमातींनी राजांना काळजापासून मदत
केली. हाहा म्हणता दर्यावर दरारा
बसला. आरमार हा एक स्वतंत्र लष्करी
विभाग झाला. आरमारी सेनापती म्हणजे
सरखेल म्हणजे सागराध्यक्ष हे पद राजांनी
निर्माण केले.
आता विजापुराहून निघाला होता
अफझलखान। आदिलशाहीने आणि
राजमाता बड्या बेगमेने या खानाला
अगदी स्पष्ट शब्दात हुकूम दिला की , ‘ हम
लढाई करना चाहते नही। ‘, ‘ ऐसा बहाना
बनाकर सिवाको धोका देना। ‘
स्वराज्यासकट शिवाजीमहाराजांचा
आणि त्यांच्या सर्व साथीदारांचा ‘
निर्मूळ फडशा ‘ पाडण्याकरिता ही प्रचंड
मोहीम खानासारख्या सर्वार्थाने प्रचंड
सेनापतीच्या नेतृत्त्वाखाली निघाली.
(इ. स. १६५९ मार्च) एवढ्या मोठ्या
प्रमाणात घोडदळ , पायदळ , तोफखाना
आणि अपार युद्धसाहित्य विजापुराहून
निघाले. सार्वभौम मराठी राष्ट्र उभी
करण्याची महाराजांची कल्पना आणि
महत्त्वाकांक्षा मुळासकट पार पार
चिरडून टाकण्याकरता आदिलशाहने
मांडलेला हा डाव होता.
जास्तीतजास्त दक्षतापूर्वक आणि
योजनापूर्वक खानाने आराखडा आखला।
शिवाजीला डोंगरी किल्ल्यांच्या
गराड्यातून बाहेर , पूवेर्कडील सपाटीच्या
प्रदेशावर यायला भाग पाडावे असा
त्याचा पहिला प्रयत्न होता. म्हणूनच
त्याने आदिलशाही हद्दीतील
देवदेवस्थानांत धुमाकूळ घालण्यास सुरुवात
केली. तेथे त्याला कोण अडविणार ?
त्याच्या स्वत:च्या सैन्यातही आमचीच
माणसे मोठ्या संख्येने होती. जणू
त्यांच्याच अध्यक्षतेखाली खान या
देवस्थानांचे धिंडवडे काढत होता. यात
त्याचा हेतू एकच होता.
शिवाजीराजांना चिडविणे. त्यांच्या
धामिर्क भावना कमालीच्या दुखविणे. हे
केले की , राजा चिडेल. भावनाविवश
होईल आणि आपल्या विरुद्ध तो चाल करून
येईल , मोकळ्या मैदानी मुलुखात!
यातच शिवाजीराजांच्या राजकीय
विवेकाला आणि लष्करी मुत्सद्देगिरीला
आव्हान होते। खबरा मिळत होत्या.
यावेळी महाराज कुडाळहून राजगडास
आले. खान म्हणजे मूतिर्मंत मृत्यूदूतच.
राजगडावर साक्षात यमाचे दूत घिरट्या
घालीत होते. राजांची अतिशय लाडकी
राणी सईबाई क्षयाने अत्यवस्थ होती.
खानाच्या बातम्यांनी स्वराज्य अस्वस्थ
होते.
अन् मग शिवाजीराजांची मन:स्थिती
कशी असेल ? स्वराज्याचं व्रत म्हणजे
अग्निदिव्यच कठीण! कठीण नाही , ते व्रत
कसलं ?

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्कर...