Skip to main content

शिवचरित्रमाला भाग २५

*तुका म्हणे येथे…*
*येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.*
पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे
लढले। तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत ते झुंजतच होते.
पन्हाळ्यावरून निसटल्यापासून पावनखिंडीत
पोहोचेपर्यंत ते सतत झपझप चालत होते. भर पावसांत.
गडद अंधारात. पन्हाळ्याहून निघाले दि. १२ जुलैच्या
रात्री सुमारे १० वाजता. अन्
पावनखिंडीत पोहोचले १ 3 जुलैच्या
दुपारी सुमारे एक वाजता म्हणजे सतत १५
तासांची धाव चालू होती
त्यांची.
तिथेच लढाई सुरू झाली। ती
रात्री जवळजवळ सात-साडेसातपर्यंत.
म्हणजे सतत सहा तास ते तलवारी
हाती घेऊन झुंजत होते. सतत २२ तास
शारीरिक श्रम. अविश्रांत.
मृत्यूशी झुंज. ही
शक्ती त्यांच्या आणि मावळ्यांच्या हातापायात
आली कुठून ? यावेळी
बाजीप्रभूंचं वय काय असावं ? इतिहासाला
माहीत नाही. पण सात पुत्रांचा
हा बाप , निदान पन्नाशी उलटलेला
शमीचा वृक्षच होता. त्यांना उद्दिष्टाचा गड
गाठायचा होता. त्यांची निष्ठा
रुदासारखी होती.
‘ अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि
फळ। ‘ फुटो हे मस्तक , तुटो हे शरीर ,
हाच त्यांचा हट्ट होता. उद्दिष्ट साधेपर्यंत मरायला
त्यांना सवडच नव्हती. ‘
तोफेआधी मरे न बाजी , सांगा
मृत्यूला! ‘ हा त्यांचा मृत्यूला निरोप होता.
बाजी , फुलाजी आणि असंख्य
मावळे सहजसहज मेले. सूर्यमंडळ भेदून गेले.
इथे एक गोष्ट आठवते। दुसऱ्या महायुद्धात
खारकोन्हच्या जवळ रशियांत जर्मन आक्रमक फौजेला
अवघ्या बारा कामगारांनी असंच
दीड दिवस झुंजून रोखून धरलं.
शत्रूची मॉस्कोवर चाललेली
धडक या बारा वेड्यांनी रोखून
धरली. मॉस्कोकडून
मदतीसाठी रशियन सेना येत
होती. ती येईपर्यंत हे बारा
झुंजले. सारे मरण पावले. मदत आली.
जर्मन हल्ला माघारी फिरला. अखेर रशियाचा
जय झाला. हे बारा कामगार रशियाचे बारा
तेजस्वी प्रेरक तारे ठरले आहेत आज.
बाजीप्रभू देशपांडे यांचं खरं आडनाव प्रधान
असं आहे। भोर शहराजवळ पाच
किलोमीटरवर ‘ सिंद ‘ या नावाचं एक छोटं
संुदर गाव आहे. तिथं बाजींचा भव्य वाडा
होता. भोवती अंगण होतं. आज
काहीही शिल्लक
नाही. जिथं बाजी राहिले ,
वावरले त्या वाड्याची ही
अवस्था. त्यांच्या वाड्याच्या जागेत आज सार्वजनिक
संडास बांधलेले आहेत.
जाता जाता एक गोष्ट सांगतो। याच युद्धकाळात (इ. स.
१६५९ – ६० ) आपल्याला आठवतंय का ?
शिवाजीराजे अफझलखानाच्या आक्रमणाला
तोंड देण्यासाठी जेव्हा राजगडावरून
प्रतापगडांस आले , तेव्हा असाच तुफानी
पाऊस होता. (श्रावण वद्य प्रतिपदा दि. ११ जुलै
१६५९ ) या दिवशी महाराज राजगडावरून
जिजाऊसाहेबांची शेवटची भेट
घेऊन निघाले. कुटुंबातील सर्वांना
त्यांनी राजगडावरच ठेवले.
जिजाऊसाहेबांची भेट घेताना
त्यांची दोघांचीही
मने किती गलबलली
असतील ? राणीसाहेब सईबाई
यातर क्षयाने अत्यवस्थ होत्या. त्यांच्या
भेटीतील मानसिक हलकल्लोळ
कल्पनेने तरी आपण ओळखू शकतो का ?
आपण शिवचित्र ओळखतो. शिवचरित्रही
शक्य तेवढे जाणतो. पण हे पिळवटून काढणारे त्यांच्या
जीवनातील क्षण आपल्याला
समजूच शकत नाहीत.
राणीसाहेबांची आणि
त्यांची ही
शेवटचीच भेट. यानंतर फक्त एक महिना
आणि सव्वीस दिवसांनी
सईबाईसाहेब राजगडावर मरण पावल्या. महाराज तेव्हा
प्रतापगडावर होते.
जिजाऊसाहेबांची ही भेट
झाल्यानंतर , महाराज अफझलवधानंतर ताबडतोब पुढच्या
मोहिमेला गेले। मध्यंतरी अनेक लढाया आणि
घटना घडल्या. मग महाराजांची आणि
जिजाऊसाहेबांची भेट पुन्हा केव्हा
घडली ? दि. १७ ऑगस्ट १६६०
म्हणजेच एक वर्ष , एक महिना आणि एक आठवडा
, मायलेकरांची भेट नाही.
विशाळगडावरून महाराज राजगडला आले इतक्या
दिवसांनी. महाराजांचा बाळ
यावेळी सव्वातीन वर्षांचा झालेला
होता. त्याला उचलून गळ्याशी घेताना
महाराजांना काय वाटलं असेल ? आहे का
कुणी कवी , कुणी
कादंबरीकार , कुणी चित्रकार ?
कुठे आहेत हे आमचे प्रतिभावंत ?
गेली दोन वर्षं (इ। १६५९ ते ६० ) दोन
आघाडीवर , दोन जबरदस्त शत्रू
स्वराज्याला छळत होते. सिद्दी जौहर आणि
शाहिस्तेखान. कधीकधी
शत्रूच्या चुकांचा आपण अचूक फायदा घेत
नाही. महाराज मात्र घेत असत. इथेच पाहा
ना! शाहिस्तेखानाने पुण्यावरच्या स्वारीत एक
फार मोठी राजकीय चूक
केली. आपल्या प्रमाणेच विजापूरचा
आदिलशाह शिवाजीराजांचा शत्रूच आहे
आणि तोही
शिवाजीराजांशी पन्हाळगड
आघाडीवर झुंजतो आहे ही
सरळ गोष्ट आपल्याला शिवाजीविरुद्ध
फायद्याचीच ठरणार आहे.
एवढी साधी अक्कल
शाहिस्तेखानाला जपता आली
नाही. त्याने विजापूरकरांचाच
आदिलशाही किल्ला , किल्ले परिंडा हा
काबीज केला! वास्तविक विजापूरकर हे
यावेळी शाहिस्तेखानाचे मित्रच नव्हते का ?
पण शाहिस्तेखानाने मित्राचाच खिसा कापला. त्याचा परिंडा
जिंकला.
हे घडलेले पाहताच विजापूरचा आदिलशाह भूकंपासारखा
हादरला. शाहिस्तेखानाने , मदत तर राहोच पण
आपल्यावर घावच घातला हे पाहून आदिलशाहने
शिवाजीमहाराजांच्या विरुद्ध
घडलेली युद्धआघाडी एकदम
बंद करून टाकली. महाराजांच्यावर पडलेला
प्रचंड युद्धभार एकदम कमी झाला.
महाराजांनीही
यावेळी आदिलशाहीविरुद्ध
कोणतीही हालचाल न
करण्याचाच विवेक केला. काम नेहमी
मुत्सद्दी विवेकाने करावे.

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

रामदास-शिवाजी संबंध

शिवाजी महाराजांच्या हाती सातारा-चाफळ १६७३ मध्ये पडले. त्यानंतर महाराजांनी चाफळच्या राममंदिराची सर्व व्यवस्था केली आणि परळी (सज्जनगड) हे समर्थ रामदासांचे वास्तव्य ठिकाण ठरवून त्यांच्यासाठी मठ बांधून दिला. शिवाजी महाराजांना समर्थांविषयी पूज्यभाव होता; तथापि महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध किती होता, हे दाखविणारा पुरावा मिळत नाही. शिवराय-समर्थ भेट ही प्रथम राज्याभिषेकाच्या अवघी दोन वर्षे आधी म्हणजे १६७२ मध्ये झाली, असे पत्रव्यवहारावरून दिसते. शिवाजीराजांनी चाफळला दिलेल्या इनामाचे साल लक्षात घेता, हे दोन्ही थोर पुरुष परस्परांना ओळखत असावेत, हे निश्चित आहे. [ ⟶ रामदास].