Skip to main content

शिवचरित्रमाला भाग २७

*शब्दांविना गर्जे आमुचा दरारा!*
उंबरखिंड म्हणजे जणू १५ कि। मी.
लांबीची
बंदुकीची नळीच
होती. मोगली सैन्याने उंबरखिंड
पुरती ओलांडलेली
नव्हती. त्या अरुंद जंगली
खिंडीत ते भयंकर ठेचून निघत होते किंवा
थेट स्वर्गात जात होते. या भयंकर
चित्तेहल्ल्याची खबर धडपडत , धावत
मोगली सरदारांनी
पिछाडीवर असलेल्या आपले
सेनापती कारतलबखान साहेबांना
दिली. बातमी देणारे व्याकूळ
झाले होते. हा भयंकर प्रकार खानाला अनपेक्षित होता.
हे सगळेच बादशाही सरदार आपल्या
प्रचंड सैन्यसंख्येवर आणि युद्धसाहित्यावर भाळलेले
असायचे. त्यांना वाटायचं , मराठे मूठभर आहेत. मारून
काढू. पण त्या मूठभर मराठ्यांची ताकद
सुरुंगाच्या दारूसारखी होती.
कारतलबखान सुन्नच झाला। कारण पाठोपाठ सर्वनाशाच्या
खबरा येऊ लागल्या. यावेळी ती
रायबाघन आपल्या घोड्यावर गप्प बसलेली
होती. खानाने आपला घोडा रायबाघनकडे
वळविला आणि तो अगतिक शब्दांत तिच्याशी
बोलू लागला , ‘ रायबाघनसाहिबा , अब मैं क्या करूं ? क्या
हालत हो गयी अपनी ?’
त्यावर रागावलेली रायबाघन खानाला
म्हणाली , ‘ पुण्याहून निघताना आपण मला
सल्ला विचारला होतात का ? आपण
शिवाजीच्या कोणत्या भागांत नि कसे जाणार
आहोत हे ठाऊक होतं का ?
‘ खानाला आपली चूक कळून
चुकली होती. पण आता या
बाईच्या शिकवणीचा ऐन कल्लोळात काय
उपयोग ? तो म्हणत होता , ‘ अब मैं क्या करूं ?’
यावर रायबाघनने अगदी स्पष्ट शब्दांत
त्याला सुनावलं की , ‘ हे असलं साहस
म्हणजे आत्मघातकी वेडेपणा आहे.
मी अजूनही आपल्याला सांगते
की , आपण मुकाट्याने
शिवाजीराजांकडे ताबडतोब वकील
पाठवा. शरण जा. क्षमा मागा त्याची. तो राजा
फार मोठ्या उदार मनाचा आहे. अजूनही तो
तुम्हाला क्षमा करील. नाही
तर सर्वनाश!
‘ खरंच होतं। खानानं आपला वकील
पाठविला. पण त्या प्रचंड गोंधळगदीर्त
शिवाजीराजाला गाठण्यासाठी
जायचं कसं ? अखेर मोठ्या धडपडीनं तो
वकील महाराजांपर्यंत जाऊन पोहोचला , हे
मोगलांचं नशीब. त्यानं महाराजांच्या पुढे
व्याकूळ होऊन विनवणी केली
की , ‘ आम्ही
माहीत नसलेल्या या मुलुखांत आलो. आमचे
चुकले. आम्हाला माफ करा. आपल्या
तीर्थरुपसाहेबांचा आणि कारतलबसाहेबांचा
दोस्ताना फार मोठा आहे. आपण मेहरनजर
करावी. आपण रहमदिल आहात.
‘ महाराजांनी मन मोठं केलं आणि म्हणाले ,
‘ एकाच अटीवर. तुमच्या
खानसाहेबांनी जे जे काही
बरोबर आणलं आहे ते सर्व जागच्या जागी
टाका. आणि रिकाम्या हाताने , निशस्त्र परत जा ,
कबूल ?’ ‘ जी , कबूल ‘
खजिना , तंबूडेरे , घोडे , डंकेझेंडे आणि सर्व
जखीरा , म्हणजे युद्धसाहित्य
जागच्याजागी टाकून खान परत जाण्यास
कबूल झाला. त्याला हे भागच होते. त्याची
प्रचंड फजिती मावळ्यांनी
केली होती.
खान परत निघाला। मान खाली घालून निघाला.
त्याचे महत्त्व आणि स्थान कायमचे संपले. तो
आयुष्यातून उठला. या उंबरखिंडीच्या
युद्धात नेताजी पालकर , तानाजी
मालुसरे , पिलाजी सरनाईक
इत्यादी उर्मट हत्याऱ्याचे सरदार
महाराजांच्या बरोबर होते. सर्वांनी मोगलांच्या
विरुद्ध हत्यार चालवून हौस फेडून घेतली.
शाहिस्तेखानाचे हिशोबवहीत
आणखी एक जबर पराभव जमा झाला.
एक गोष्ट आपल्या लक्षात आली ना ?
कारतलबखान लोणावळ्याकडून पश्चिमेला
उंबरखिंडीत आला. पण महाराज
आधीच (बहुदा एक फेब्रुवारी
१६६१ ) पुण्याकडून ताम्हणीच्या किंवा
सवाष्णीच्या घाटाने कोकणात उतरले आणि
त्यांनी उंबरखिंडीच्या तोंडावरच
खानाची वाट अडविली. त्याचं
सगळं होतं नव्हतं तेवढं साहित्य कब्जात घेतलं.
अंगावरचे कपडे शिल्लक ठेवले हे खानाचं आणि त्याच्या
सैन्याचं नशीबच.
महाराज दि. 3 फेब्रुवारी १६६१
रोजी पाली , जांभूळपाडा ,
नागोठणे या मार्गाने महाडकडे निघाले. पण
त्यांची सावधता केवढी!
त्यांनी नेताजी पालकराला सुमारे
दोन-एक हजार फौजेनिशी
उंबरखिंडीतच ठेवले. न जागो , फजित
पावलेला कारतलब पुन्हा युद्धसाहित्य जमवून कोकणात
उतरू पाहिला , तर त्याच्या दुसऱ्या
फजितीची व्यवस्था
महाराजांनी नेताजीवर
सोपविली.
महाराज आता चिपळूणजवळ श्री
परशुरामाच्या दर्शनासाठी निघाले. महाराज
धामिर्क होते. पण त्यांच्या कामाच्या आड ते देवधर्म ,
व्रतवैकल्य येऊ देत नव्हते. ते उरकूनच आता
श्रीदर्शनास जात होते.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...